शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीकडून ग्राहकांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:42 IST

तळोदा शहरात अनेक महिन्यांपासून वाढीव वीज बिल, विनारीडिंग वीजबिल, रीडिंगनुसार वीज बिल येणे, अशा तक्रारी वाढल्या आहेत. ज्यादा येणाऱ्या ...

तळोदा शहरात अनेक महिन्यांपासून वाढीव वीज बिल, विनारीडिंग वीजबिल, रीडिंगनुसार वीज बिल येणे, अशा तक्रारी वाढल्या आहेत. ज्यादा येणाऱ्या वीज बिलांमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक ग्राहकांना रीडिंग न घेता अंदाजे बिले पाठवण्यात आली. या सर्व प्रकारामुळे वीज ग्राहकांनी वीज बिल भरण्यात असमर्थता दाखवली तर काही ग्राहकांनी टप्प्याटप्प्याने वीज बिल भरणे पसंद केले. असे असले तरी नागरिकांच्या वाढीव वीज बिलासंदर्भात अनेक तक्रारी असताना वीज वितरण कंपनीने मात्र नागरिकांच्या तक्रारींकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले आहे. लोकांनी आमच्याकडे लेखी तक्रारी द्याव्यात, असे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात येते. परंतु अनेक जणांनी लेखी तक्रारी देऊनदेखील त्या समस्यांचे पूर्णपणे समाधान झाले नसल्याचा अनुभव आहे. अनेकदा लेखी तक्रार आल्यावर वीज वितरण कंपनीकडून फी भरायला लावून दुसरे मीटर रीडिंग तपासले जाते. मात्र या प्रक्रियांमुळे ग्राहकांचे समाधान होत नाही. कारण ग्राहकांना त्याबद्दल तांत्रिक ज्ञान नसल्याने वीज वितरण कंपनीकडून रीडिंग बरोबर येत असल्याचे थातूरमातूर उत्तरे दिली जातात.

काही ग्राहकांना जादा वीज बिल येत असले तरी ग्राहक अर्ज व कागदपत्रांच्या प्रक्रियेत अडकणे पसंत करत नाही. बहुतेक ग्राहक हे जादा वीज बिल आले तरी कटकट नको म्हणून वीज बिल भरून मोकळे होतात. मात्र वीज वितरण कंपनीला वारंवार लेखी सूचना करूनदेखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही कंपनीकडून करण्यात येत नाही.

वाढीव वीज बिलांसदर्भात काही प्रमाणात लेखी तक्रारी आल्या आहेत. त्याचे निराकरण होत असून, आणखी काही ग्राहकांच्या बिलाबाबत तक्रारी असतील तर ती लेखी द्यावी.

- इम्रान पिंजारी, सहायक अभियंता, वीज वितरण कंपनी, तळोदा

वाढीव वीज बिलांची समस्या तळोदा शहरात मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकानी या विरोधात ग्राहक मंच, ग्राहक पंचायतीकडे तक्रार करावी. त्यांना संपूर्ण मदत करून वीज वितरण कंपनीच्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्यात येईल. - राजेश चौधरी, जिल्हा संघटक, महाराष्ट्र ग्राहक पंचायत, नंदुरबार जिल्हा