बांधकाम अभियंत्यास १० हजाराची लाच घेतांना शहाद्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:09 IST2020-06-18T12:09:33+5:302020-06-18T12:09:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : बांधकाम बिलाची रक्कम अदा करण्यासाठी ठेकेदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना शहादा पंचायत समितीचे ...

Construction engineer arrested for accepting bribe of Rs 10,000 | बांधकाम अभियंत्यास १० हजाराची लाच घेतांना शहाद्यात अटक

बांधकाम अभियंत्यास १० हजाराची लाच घेतांना शहाद्यात अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : बांधकाम बिलाची रक्कम अदा करण्यासाठी ठेकेदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्विकारतांना शहादा पंचायत समितीचे सहायक बांधकाम अभियंता ईश्वर सखाराम पटेल यांना रंगेहात अटक करण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत लाचेची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी पंचायत समिती आवारात ही कारवाई केली. गृपग्रामपंचायत होळगुजरी व टेंभली येथे पेसा अंतर्गत गावातील विकास कामे केली. त्याचे एकूण बिल सहा लाख ४३ हजार रुपये झाले होते. त्यापैकी एक लाख रुपये कामासाठी शासनाकडून अ‍ॅडव्हान्स म्हणून मिळाले होते . उर्वरित पाच लाख ४३ हजार रुपयांच्या कामाच्या बिलाच्या फाइलवर बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता इश्वर सखाराम पटेल यांची सही बाकी असल्याने बिल मंजूर होत नव्हते. सदर बिलाची रक्कम मिळावी यासाठी ठेकेदार यांनी वेळोवेळी बांधकाम विभागाशी संपर्क साधला मात्र त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही व बिलही मिळाले नाही.
ठेकेदार यांनी अभियंता ईश्वर पटेल यांची भेट घेतली असता पटेल यांनी बिलावर सही करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे ठेकेदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. १७ रोजी दुपारी पंचायत समिती आवारात १० हजाराची लाच घेतांना पटेल यांना रंगेहात पकडण्यात आले. शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाच लुचपत विभागाचे उपअधिक्षक शिरिष जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल अहिररराव, हवालदार उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, दीपक चित्ते, संदीप नावडेकर, मनोज अहिरे, अमोल मराठे, ज्योती पाटील यांच्या पथकाने केली.
दरम्यान, गेल्या आठवड्यात नंदुरबार पंचायत समितीत देखील बांधकाम विभागातील अभियंता जगदाळे यांना ८५ हजार रुपयांची लाख घेतांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आठवडाभरात ही दुसरी घटना घडल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

Web Title: Construction engineer arrested for accepting bribe of Rs 10,000