शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

माळी समाजात विधवा महिलांच्या पुनर्विवाहास संमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

माळी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा माळी समाज कार्यालयात घेण्यात आली होती. या सभेला समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...

माळी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा माळी समाज कार्यालयात घेण्यात आली होती. या सभेला समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी पंचांचे अध्यक्ष अरविंद मगरे होते. या वेळी उपाध्यक्ष सुधीरकुमार माळी, सचिव उखा पिंपरे, सदस्य ईश्वर मगरे, लक्ष्मण सागर, भगवान मगरे, अनिल मगरे, सुरेश चव्हाण, हेमलाल मगरे, योगेश्वर पंजराळे, अजित टवाळे, संजय माळी, सुनील सूर्यवंशी, राजेश कर्णकार, अरुण कर्णकार, बालू राणे, पंकज राणे, पंकज शेंडे, किरण राणे, रत्नाकर शेंडे, शिरीष माळी, अतुल सूर्यवंशी, संतोष कर्णकार, शशिकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. याशिवाय, पंचांचे माजी अध्यक्ष गिरधर सागर, वरिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ शशिकांत मगरे, अनिल पिंपरे, दीपक मगरे, डॉ. देविदास शेंडे, मोहन सूर्यवंशी, जयेंद्र सूर्यवंशी, राजाराम राणे, पवन मगरे, सुमित लोखंडे, मुकुंदा कर्णकार, अनिल मगरे यासह समाजातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा बंद करण्यासाठी चर्चा करण्यात आली. याशिवाय, लग्नकार्यातील अनावश्यक रुढी, परंपरा बंद करून अनाठायी खर्च कमी करण्यावर भर देण्यात आला.

सभेसाठी पंचांचे सेक्रेटरी संदीप सूर्यवंशी व सहायक सेक्रेटरी महेश मगरे यांनी परिश्रम घेतले.

युवकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय

समाजातील बरेच युवक बेरोजगार आहेत, तर काहींचा रोजगार कोरोना महामारीने हिरावला आहे. यावर समाजातील तरुणांनी उद्योजकता विकास संकल्पना पंचांपुढे मांडली. उद्योजकता विकास व रोजगारनिर्मितीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासंबंधी पुस्तकांचा संच इत्यादी उपलब्धतेसाठी पंचांकडून युवकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

समाजात मुलींचे प्रमाण कमी

एकीकडे समाजात मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे बऱ्याच मुलांचे विवाह झाले नाही. विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे कोरोना महामारीमुळे समाजात लग्न होऊन अल्प कालावधीतच महिला विधवा झाल्या आहेत. अशा महिलांचे व त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करून अशा महिलांचे पुनर्विवाह करून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पंचांतर्फे करण्यात येणार आहे. लवकरच इच्छुक महिलांची यादी बनवून त्यांच्याशी संपर्क करून त्यांचे व नातेवाइकांचे कौन्सिलिंग करून पुनर्विवाहासाठी मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच समाजातील निराधार विधवा महिलांना पंचांच्या वतीने आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे, असे दोन महत्त्वाचे निर्णय या सभेत घेण्यात आले आहे. या निर्णयांचे समाजबांधव व शहरवासीयांकडून कौतुक करण्यात येत आहे.