शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यावर हल्ला करणाºया प्राण्याबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:23 IST

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : ‘एकादशीचा फराळ बनवून ठेवा मी आता शेतातून ट्रॅक्टरवर चक्कर मारुन येतो’ ...

वसंत मराठे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : ‘एकादशीचा फराळ बनवून ठेवा मी आता शेतातून ट्रॅक्टरवर चक्कर मारुन येतो’ असे सांगून गेलेले मोहिदे ता़ तळोदा शेतकरी शरद चव्हाण हे हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाले़ सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे तळोदा तालुक्यात भितीचे वातावरण आहे़ मंगळवारी पहाटेच्या सुमारास मयत शरद चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़हल्ला करणाºया प्राण्याबाबत संभ्रम कायम असून बिबट्याऐवजी अस्वलाने हल्ला केला असावा असे आता वनविभाग सांगत आहे़ याबाबत अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असला तरी या भागात बिबट्याच्याही पायांचे ठसे मिळाले आहेत़ मोहिदा येथील शरद खंडू चव्हाण सोमवारी सायंकाळी नवीन घेतलेले लहान ट्रॅक्टर घेऊन शेताकडे गेले होते़ शेतात चक्कर मारुन आल्यानंतर साडेसात वाजेच्या सुमारास ते शेतबांधावर असताना मागून आलेल्या हिंस्त्र प्राण्याने त्यांच्यावर हल्ला करत गंभीर जखमी केले होते़ हल्ल्यावेळी या भागात कोणीही नसल्याने त्यांना वेळेवर मदत मिळू शकली नाही़ ते फोन उचलत नसल्याने त्यांचे कुटूंबिय चिंतेत पडले होते़ मुलगा थेट शेतात गेल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला़ त्यांना उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले़ या घटनेनंतर मोहिदा गाव आणि परिसर स्तब्ध झाला आहे़ समाजकार्य आणि ग्रामस्थांच्या मदतीत अग्रेसर राहणाºया चव्हाण यांच्या मृत्यूने गावावरही दु:खाचे सावट पसरले आहे़ दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार राजेश पाडवी, वनसंरक्षक एस़बीक़ेवटे, सहायक उपवनसंरक्षक ई़बी़चौधरी, तहसीलदार पंकज लोखंडे, वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़तालुक्यात आमलाड, रांझणी, अमोणी, रापापूर येथे श्वापंदांचा हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ शेतशिवारात बिबट्या व अस्वलांचा संचार असताना उपाययोजना न करता विभागाने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे़हिंस्त्र वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना वनविभागाकडून १५ लाख रुपयांची मदत दिली जाते़ यातील तीन लाख रुपयांची मदत ही जागेवर दिली जाते़ तथापि मयत चव्हाण यांच्या नातेवाईकांना ही मदत अद्याप मिळालेली नाही़ शासनाने ही मदत देण्याबाबत उपवनसंरक्षक यांना दिलेले अधिकार काढून घेतल्याने ही मदत थांबल्याचे सूत्रांनी म्हटले आहे़ मयत चव्हाण यांच्या कुटूंबाची भेट घेणाºया अधिकाºयांनी मदतीचे आश्वासन दिले आहे़मंगळवारी वनविभागाने मोहिदा शिवारात पाच ट्रॅप कॅमेरे, तीन पिंजरे व कर्मचारी गस्तीसाठी नियुक्त केले आहेत़मंगळवारी पहाटे चव्हाण यांचे पार्थिव मोहिदा येथे आणल्यानंतर त्यांच्या कुटूंबियांनी एकच आक्रोश केला होता़ त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे़ मोहिदा येथील विकासोचे चेअरमन असलेले चव्हाण हे शेतकºयांच्या हक्कासाठी वेळावेळी लढत होते़