परीक्षेवेळी गोंधळ करणा:या 34 जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 21:44 IST2020-03-11T21:43:56+5:302020-03-11T21:44:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने फिरणा:या तब्बल 34 जणांवर ...

Confusing During Examination: These 34 accused have been charged | परीक्षेवेळी गोंधळ करणा:या 34 जणांवर गुन्हे दाखल

परीक्षेवेळी गोंधळ करणा:या 34 जणांवर गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने फिरणा:या तब्बल 34 जणांवर पोलीस कारवाई होऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ सोमवारी परीक्षा सुरु असताना ही कारवाई करण्यात आली़ सोमवारी दहावीची परीक्षा सुरु असताना नवापुर येथील सार्वजनिक हायस्कूल, श्री शिवाजी हायस्कूल तसेच चिंचपाडा येथील वनवासी विद्यालया बाहेर गोंधळ करुन कॉपी पुरवण्याच्या प्रयत्नात असलेल्या 12 जणांवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आल़े खांडबार येथील अॅग्री हायस्कूल येथे कॉपी पुरवणा:या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत़ तळोदा येथे तब्बल 12 जणांवर पोलीसांनी कारवाई केली आह़े तळोद्यातील न्यू हायस्कूल, नेमसुशील विद्यामंदिर व सिनीयर कॉलेज परिसरात फिरणा:यांवर ही कारवाई करण्यात आली़ नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील यशवंत विद्यालय व डी़आऱ हायस्कूलच्या परिसरात फिरुन गोंधळ करणा:या चार जणांवर कारवाई करण्यात आली होती़ सर्व 34 जणांविरोधात जिल्हाधिकारी यांनी दहावीच्या परीक्षेसाठी लागू केलेल्या बंदी आदेशांचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

Web Title: Confusing During Examination: These 34 accused have been charged