शहाद्यात दोन रुग्णांमुळे वाढल्या नागरिकांच्या चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:43 IST2020-06-26T12:43:23+5:302020-06-26T12:43:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील गणेशनगर भागातील २९ वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णवाहिका चालकाचे दोन नातेवाईक कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त ...

Concerns of citizens increased due to two patients in Shahada | शहाद्यात दोन रुग्णांमुळे वाढल्या नागरिकांच्या चिंता

शहाद्यात दोन रुग्णांमुळे वाढल्या नागरिकांच्या चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील गणेशनगर भागातील २९ वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णवाहिका चालकाचे दोन नातेवाईक कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे़ या भागातील तीन बाधित रुग्णांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ़ चेतन गिरासे यांनी दिली
गणेशनगर भागातील १०८ रुग्णवाहिका चालक कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबासह व अति संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वारंटाईन कक्षात दाखल करुन स्वॅब नमुने घेत तपासणीसाठी दिले होते़ या सर्वांचे अहवाल गुरुवारी प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ यात रुग्णवाहिका चालकाच्या दोन नातेवाईकांचा अहवाल हा पॉझिटिव्ह असून उर्वरित सहा नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़
बाधित चालक हा गेल्या आठवड्यात एका डॉक्टर सोबत नाशिक येथे गेला होता़ तेथून परतल्यानंतर त्याला कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्याने प्रशासनाने त्यास लागलीच विलगीकरण कक्षात दाखल केले होते़
तीन दिवसानंतर चालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने गणेशनगर परिसराला कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला होता़ येथील वसाहती सील केल्या आहेत़ या प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी आठ वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉक्टर चेतन गिरासे यांनी दिली आहे़

Web Title: Concerns of citizens increased due to two patients in Shahada