शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात भाजीपाला टंचाईसह उपलब्ध भाज्यांचे दर दुपटीने वाढल्याने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात भाजीपाला टंचाई निर्माण झाली असून उपलब्ध भाजीपाल्याचे दर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात भाजीपाला टंचाई निर्माण झाली असून उपलब्ध भाजीपाल्याचे दर दुपटी आणि तिपटीने वाढल्याचे नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे़ प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सर्व बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत़ तळोदा शहराला भाजीपाला पुरवठा करण्याचा एकमेव मार्ग असलेल्या मार्केट यार्डात भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार बंद करण्यात आल्यानंतर शहरात भाजीपाला आवक कमी झाली आहे़ यातून मिरची प्रति किलो थेट १६० रुपयांना विक्री होत आहे़ बटाटे प्रतिकिलो ४० ते ५०, कांदे ५० तर पालेभाज्यास थेट ६० रुपये प्रतिकिलो दरांमध्ये मिळू लागल्या आहेत़विशेष म्हणजे ५ रुपयात जुडी मिळणारी कोथिंबीर आता थेट १० ते २० रुपयांपर्यत जाऊ पोहोचली आहे़ भाजीपाला ही जीवनावश्यक वस्तू असल्याने त्यांचे दर हे नियमित ठेवण्याची अपेक्षा या काळात होती़ परंतू तळोदा शहरात या नियमनाला खो दिला जात आहे़ भाजीपाला विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना भाजीपुरवठा करणाऱ्यांकडून दर वाढ करण्यात आल्याने भाजीपाला विक्रेत्यांकडून नाईलाजाने दरवाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ हा प्रकार थांबवण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ तळोदा शहरात भाजीपाला पुरवठा करणारे शेतकरी नियमित दरानेच भाजीपाला पुरवठा करत असताना अचानक वाढवण्यात आलेल्या दरांचे रहस्य प्रशासनाने जाणून घेण्याची अपेक्षा आहे़ तालुक्यातील ग्रामीण भागातून साधारण २० ते २५ किलोमीटर अंतरातील गावांमधील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी येत आणत असल्याने त्याच्या वाहतूकीसाठी खूप मोठा वाहतूक खर्च लागत नसल्याने दरवाढीची कोणतीही सबब मान्य होत नसल्याने प्रशासनाने भाजीपाला खरेदी करणारे तसेच किरकोळ विक्रेत्यांसोबत संंवाद साधून योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे़