शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्लाॅट विक्रीत फसवणुकीची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:32 IST

नंदुरबार : प्लाॅट विक्रीमधून दोघांनी फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करून ...

नंदुरबार : प्लाॅट विक्रीमधून दोघांनी फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करून न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याविषयी दिलेल्या तक्रारीत तक्रारदार शरद मंगा मराठे यांनी म्हटले आहे की, नंदुरबारमध्ये आर. के. कन्ट्रक्शन नावाने रवींद्र मराठे हे प्लाॅट विक्री व घर बांधकाम करून विक्री करतात. त्यांनी आपल्याला २००९मध्ये शहरालगत पथराई शिवारात हप्त्याने प्लाॅट विक्रीची स्कीम सुरू असून, त्याठिकाणी सुलभ हप्त्याने प्लाॅट देण्याचे आमिष दाखवून पूर्ण हप्त्याचे पैसे घेतले. परंतु, प्लाॅट नावावर करण्याची वेळ आली, त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली. ज्या जागेवर प्लाॅट दिला जाणार होता, त्या जागेचे कागदपत्र पाहिले असता, ती जागा २००८मध्येच दुसऱ्याला विकल्याचे स्पष्ट झाले आहे. आता ते पैसे परत देण्यास व प्लाॅट देण्यासही टाळाटाळ करत असून, धमकी देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपल्यासोबत इतरही अनेकांची त्यांनी अशाचप्रकारे फसवणूक केल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे.