शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

राजेश पाडवी यांच्या विरोधात तक्रारीने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 22:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेश उदयसिंग पाडवी यांनी शासकीय सेवेत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले राजेश उदयसिंग पाडवी यांनी शासकीय सेवेत असताना बेकायदा बेनामी संपत्ती मोठय़ा प्रमाणात जमा केली असून, त्यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांचे सावत्र बंधू नितीन उदेसिंग पाडवी यांनी राज्याचे पोलीस आयुक्त व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक पाडवी व तक्रारदार नितीन पाडवी हे दोघे सावत्र बंधू असून, ते शहादा मतदार संघाचे आमदार उदेसिंग पाडवी यांचे मुले आहेत.यासंदर्भात दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, राजेश पाडवी दुर्धर आजाराने आजारी असल्याचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून वैद्यकीय रजेवर असताना राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासह लोक प्रतिनिधींच्या स्वागताचे, अभिनंदनाचे फलक स्वत:च्या फोटोसह लावून राजकीय कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतात. ते पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई येथील अंधेरी ईस्ट पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शासनाने त्यांची आरे कॉलनी पोलीस स्टेशनला बदली केलेली असताना तेथे रुजू न होता वैद्यकीय रजेवर आहेत. आजार पणाची रजा घेवून शहादा-तळोदा विधानसभा मतदार                   संघातील गावांमध्ये फिरत असून, त्यांनी भारतीय जनतापक्षाकडे उमेदवारी मागीतली आहे आणि मुलाखतही दिली आहे. त्यांचा राजीनामा अथवा व्हीआरएस मंजूर नसतांना ते अशा पद्धतीचे कृत्य   करीत असल्याचा आरोप करून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार पुत्रांच्या या वादामुळे परिसरात राजकीय चर्चाना उत आला असून, त्यामुळे खळबळ उडाली    आहे.

माङयात आणि वडील आमदार उदेसिंग पाडवी यांच्यात कुठलाही वाद नाही. मात्र माझी वाढती लोकप्रियता पाहून सावत्र बंधूने सुड भावनेने तक्रार केली आहे. माझी संपत्ती वारस हक्काने मिळाली असून, ते आमदार पाडवी यांच्या उमेदवारी अर्जातही 2014 मध्ये नोंद होती. त्यामुळे आरोप निराधार आहेत. -राजेश उदेसिंग पाडवी, पोलीस निरीक्षक, मुंबई