सीटी स्कॅन सेंटरवर नियंत्रणासाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:48 PM2020-09-30T12:48:25+5:302020-09-30T12:48:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यसरकारने खाजगी रुग्णालये आणि तपासणी सेंटरवरील सिटीस्कॅनचे नवे दर निश्चित केले आहेत़ या पार्श्वभूमीवर ...

Committee for Control of CT Scan Center | सीटी स्कॅन सेंटरवर नियंत्रणासाठी समिती

सीटी स्कॅन सेंटरवर नियंत्रणासाठी समिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यसरकारने खाजगी रुग्णालये आणि तपासणी सेंटरवरील सिटीस्कॅनचे नवे दर निश्चित केले आहेत़ या पार्श्वभूमीवर जादा दर आकारणी होवू नयेत म्हणून लक्ष ठेवणारी नियंत्रण समिती स्थापन करण्याचे आदेश शासनाचे होते़ यानुसार एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोघे नायब तहसीदारांची समिती गठीत करण्यात आली आहे़
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दक्षता म्हणून विविध उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत़ १६ स्लाईडपेक्षा सिटीस्कॅनसाठी दोन हजार, १६ ते ६४ स्लाईडच्या सिटीस्कॅनसाठी २ हजार ५०० तर ६४ पेक्षा अधिक स्लाईडसाठी ३ हजार रूपये दर आकारण्याचे आदेश शासनाने दिले आहेत़ या आदेशानंतर सोमवारपासून जिल्हा रुग्णालयाकडून जिल्ह्यातील दोन सिटीस्कॅन सेंटर्सला सूचना करण्यात येत होत्या़ परंतु दर अधिक असल्याच्या तक्रारी करण्यात येत असल्याने जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी मंगळवारी एक वैद्यकीय अधिकारी, दोन नायब तहसीलदार आणि एक महसूल कर्मचारी अशा पाच जणांची समिती तयार केली आहे़ ही समिती दोन्ही सेंटर्सला भेट देत नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेणार आहे़
दर अधिक घेतले जात असल्यास तशी माहिती जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील कारवाई होणार आहे़ जिल्हास्तरावर समिती स्थापन झाल्याने कोरोना बाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे़

दरम्यान याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱड़ी़भोये यांना विचारणा केली असता, जिल्ह्यातील सिटीस्कॅन सेंटर्सला बुधवारी पत्र दिले जाणार आहे़ शासनाने ठरवून दिलेल्या दरांची माहिती देण्यात येणार आहे़ जादा दर घेत असल्यास संबधित सेंटर्सचे आॅडिट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ जिल्ह्यात दोन ठिकाणचे दर सामान्यांना परवडणारे नसल्याचे सांगण्यात आले आहे़

Web Title: Committee for Control of CT Scan Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.