शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

गोमाई नदीवरील साखळी बंधाऱ्याच्या कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

शहादा तालुक्यातील गोमाई नदी पुनरुज्जीवन करण्याबाबत मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने डॉ.किशोर पाटील, दिनेश खंडेलवाल, अतुल जयस्वाल, माधव पाटील आदींनी ...

शहादा तालुक्यातील गोमाई नदी पुनरुज्जीवन करण्याबाबत मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने डॉ.किशोर पाटील, दिनेश खंडेलवाल, अतुल जयस्वाल, माधव पाटील आदींनी ७ मार्च २०१७ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांना दिले होते. उन्हाळाच्या सुरुवातीलाच शहादा तालुक्यातील पाणीटंचाई अनेक ठिकाणी जाणवत आहे. यात गोमाई नदीवर मध्य प्रदेश सिमेत मोठा बंधारा बांधला गेल्याने हे पाणी मध्य प्रदेशातच अडविले गेले आहे. त्यामुळे गोमाई नदीचे महाराष्ट्रातील पात्र हे कोरडेच आहे. याचा फटका शेतकरी, शेतमजूर व जनावरांना बसला आहे. भविष्यात नदीलगतच्या गावांना प्रचंड पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. म्हणून गोमाई नदीवर काही ठिकाणी लहान-मोठे बंधारे बांधून नदी पुनरुज्जीवित करण्याचे अत्यंत गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले होते. त्यानुसार तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी शहाद्याचे तत्कालीन प्रांताधिकारी साताळकर यांना गोमाई नदीविषयी अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते. मागणीनुसार गोमाई नदीवरील साखळी बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. त्यांच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला.

नदीचे पाणी वाहून जाऊ नये व शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून या भागातील गोगापूर, दामळदा, कवळीथ, भोरटेक, ओझर्टा, श्रीखेड या परिसरातील गोमाई नदीसोबत उमरी व खापरी नदीवरदेखील बंधारे बांधण्याची मागणी करण्यात आली होती. या साखळी बंधाऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे. बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्यामुळे पाण्याची उपलब्धता होणार आहे.

मार्च २०१७ मध्ये आम्ही निवेदन सादर केले होते. आज आम्हाला मनस्वी आनंद होतो की आमच्या मागणीनुसार गोमाई नदीवरील साखळी बंधारे मंजूर होऊन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ होऊन ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. या धरणांचा परिसरातील शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे.

-डॉ. किशोर पाटील, प्रदेश सदस्य, किसान मोर्चा