शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST

राज्य शासनाच्या १३ एप्रिल रोजीच्या आदेशातील तरतुदींच्या अधीन राहून विशेष खबरदारी घेत रमजान ईद साजरी करण्याबाबत सूचना देण्यात ...

राज्य शासनाच्या १३ एप्रिल रोजीच्या आदेशातील तरतुदींच्या अधीन राहून विशेष खबरदारी घेत रमजान ईद साजरी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने हे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करिता मुस्लिम बांधवांनी नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रम आपल्या घरातच साजरे करून ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे पालन करणे उचित ठरेल. नमाज पठण करिता मशिदींमध्ये तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. रमजान ईद निमित्ताने स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळे व्यतिरिक्त सामान खरेदीसाठी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये.

कोविड-१९ विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी राज्यात फौ.दं.प्र.सं.कलम १४४ लागू असल्याने व रात्रीची संचारबंदी असल्याने संचारबंदी कालावधीत रस्त्यावर स्टॉल लावू नये आणि नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण फिरू नये. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कोविड-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याआधी व चालू असतानाच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथ प्रतिबंधक कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय दंड संहितामधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.