वाका येथे सामुहिक आरजीपूजन व व्यसनमुक्ती मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:23 IST2020-02-06T12:23:28+5:302020-02-06T12:23:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आपकी जय परिवारातर्फे सज्जीपूर ता. निझर येथे व्यसनमुक्ती मेळावा व सामूहिक आरतीपूजन कार्यक्रम घेण्यात ...

A collective RGPujan and addiction-free rally will be held in Waka | वाका येथे सामुहिक आरजीपूजन व व्यसनमुक्ती मेळावा

वाका येथे सामुहिक आरजीपूजन व व्यसनमुक्ती मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आपकी जय परिवारातर्फे सज्जीपूर ता. निझर येथे व्यसनमुक्ती मेळावा व सामूहिक आरतीपूजन कार्यक्रम घेण्यात आला. यातून उपस्थितांना व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी आपकी जय परिवाराचे प्रमुख जितेंद्र पाडवी, प्रेम पाडवी, प्रवेश पाडवी, लक्ष्मण वळवी यांनी मार्गदर्शन केले. सज्जीपूर येथील संजय पाडवी, जयराम गावीत, दिलीप पाटील, अंतुर्लीले सरपंच गणेश ठाकरे, उपसरपंच गणेश पाटील, निजर सुहास पाडवी, सरपंच भिल, सरपंच योगेश पाडवी, नवल पाडवी, मायाबाई पाडवी, सुनिता पाडवी, रशिला ठाकरे, प्रमिला पाडवी, कल्पना पाडवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संजय ठाकरे, बिजलाल पाडवी, काळूसिंग भिल, सुभाष पाडवी, विलास पाडवी यांनी परिश्रम घेतले. यावेळी गुजरात व महाराष्ट्र मध्यप्रदेशातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी संत गुलाम बाबा यांनी दिलेल्या पाच तत्त्वांच्या आधारावर संसार चालवण्याचे आवाहन करण्यात आले. दारिद्र्य टाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवत कुटुंबातील मुलांना शाळा महाविद्यालयात पाठवा, शिक्षणाच्या माध्यमातून आपली मुले मोठी होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन देखील मान्यवरांनी या मेळाव्यात केले. आप की जय परिवारातर्फे व्यसनमुक्ती चळवळीचे प्रणेते गुलाम महाराज यांनी दिलेल्या शिकवणीचा प्रसार अन् प्रचार करण्यात येत आहे. यासाठी केवळ नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर गुजरात व मध्यप्रदेशातही भजन व अन्य उपक्रमातून जनजागृती होतत आहे.

Web Title: A collective RGPujan and addiction-free rally will be held in Waka