शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

३०० वर्षापासूनचा वटवृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंदाणे : शहादा ते मंदाणे राज्य मार्गाचे रूंदीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. या मार्गावरील पिंपर्डे ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा ते मंदाणे राज्य मार्गाचे रूंदीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. या मार्गावरील पिंपर्डे गावाजवळील ३०० वर्षापासून अनेक पिढ्यांचे साक्षीदार ठरलेल्या व हजारो वाटसुरूंना सावलीच्या रूपाने मायेची उब देवून सर्वांचे आश्रयस्थान बनलेला वडाचा महाकाय वृक्ष रस्ता कामामुळे लवकरच नामशेष होणार असल्याने पिंपर्डे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी हे वृक्षमंदिर वाचविण्याची धडपड चालवली आहे.यासाठी बाजूच्या शेतकऱ्यांनी बाजुकडील जागाही देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत बांधकाम विभाग काय भूमिका घेते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. याबाबत असे की, शहादा तालुक्यातील पिंपर्डे गाव शिवारात असलेले हे अजस्त्र वडाचे झाड सुमारे ३०० वर्षापासून पुरातन काळापासून दिमाखात उभे आहे.या महाकाय वृक्षाजवळच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील विहीरदेखील आहे. या दोन्ही वास्तु पुरातन काळाची साक्ष देणाºया आहेत. गावापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असणाºया या वृक्षाच्या छायेत तिन-चार पिढ्या खेळल्या, बागडल्या आहेत. या महाकाय वटवृक्षावर पोपट, वटवाघुळे, बगळे, कावळे, मधमाशांचे पोळे असे असंख्य पक्षी विसावलेले असतात. हा वटवृक्ष मोठ्या प्रमाणात प्राणवायूचीही निर्मिती करतो.पौराणिक व धार्मिक दृष्ट्यादेखील महत्त्व या वृक्षाला आहे. वटपौर्णिमेनिमित्त पंचक्रोशितील कित्येक महिला मोठ्या श्रद्धेने या वृक्षाची पुजा मोठ्या श्रद्धेने करतात. यामुळे आठवणींचा ठेवा व पुरातन काळाची साक्ष देणारा हा महाकाय वृक्ष आता रस्ता कामात अडथळा ठरला अहे.शहादा ते मंदाणे, वडगाव ते शहाणे-मालकातर या राज्यमार्गाच्या रूंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू झाले आहे. या रस्ता कामात अनेक झाडे येत असल्याने त्याची कटाई करण्यासाठी वनविभागाकडे परवानगीही घेण्यात आली होती. आता वनविभागानेही वृक्ष तोडीस परवानगी दिल्याने गेल्या १० ते १५ दिवसापासून रस्ता कामात अडथळा ठरणाºया झाडांची कटाई करण्यास सुरुवात झाली आहे.याच महामार्गावरील कर्जोत ते पिंपर्डे दरम्यान रस्त्याला लागूनच हे सर्वात मोठे वडाचे झाड आहे. उन्हाळा असो की, पावसाळा अशावेळी ये-जा करणºया वाटसुरुंना या वटवृक्षाखाली क्षणभर का असेना थांबण्याचा मोह होणार नाह, असे कधी होणार नाही. हजारो भाविकांना आश्रय देणारे व भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले हे वृक्षमंदिर तोडले जावू नये, अशी काही पर्यावरण प्रेमींनी भूमिका घेतली असून, ते वाचविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे.हे झाड तोडले जावू नये यासाठी निवेदनही काही जागरूक नागरिकांनी संबंधितांकडे दिले आहे. त्याचप्रमाणे झाड वाचविण्यासाठी बाजूच्या शेतकºयानी रस्त्यासाठी जागाही देण्याची तयारी दर्शविली आहे.