वडाळी येथे जनता कर्फ्यूला नागरिकांकडून प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST2021-03-26T04:30:08+5:302021-03-26T04:30:08+5:30

वडाळी येथे झालेल्या बैठकीत सांरगखेडा पोलीस ठाण्याचेे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी गावातील नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्यासाठी आवाहन केेले ...

Citizens respond to public curfew at Wadali | वडाळी येथे जनता कर्फ्यूला नागरिकांकडून प्रतिसाद

वडाळी येथे जनता कर्फ्यूला नागरिकांकडून प्रतिसाद

वडाळी येथे झालेल्या बैठकीत सांरगखेडा पोलीस ठाण्याचेे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी गावातील नागरिकांना जनता कर्फ्यू पाळण्यासाठी आवाहन केेले होते. यावेळी त्यांनी जनता कर्फ्यू गावातील प्रत्येकांच्या आरोग्यासाठी असून परिवाराचा महत्वपुर्ण घटक आपण आहात जर कोरोनामुळे आपल्या घरात दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या परिवाराचे काय होईल अशी भावनिक साद देत ग्रामस्थांना घरी राहून काम करण्याचे आवाहन केले होते. तरी वडाळी येथील नागरिकांनी जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिल्याने पोलीस निरीक्षकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहेे. गावात जनता कर्फ्यू दरम्यान कडकडीत बंद पाळण्यात आल्याने ग्रामपंचायत, आंबेडकर चौक, बस स्टँण्ड परिसर, माऊलीपुरा, वल्लभ नगर, शिवाजी नगर, नविन वसाहत या भागात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व्यवसाय बंद करण्यात आले होते. यावेळी पोलीस पाटील गजेंद्रगीर गोसावी, ग्रामविस्तार अधिकारी बी.बी.देसले, सरपंच जामा भिल, उपसरपंच हिंमत सोनवणे आदीनी परिश्रम घेतले.

Web Title: Citizens respond to public curfew at Wadali