शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अफवांना रोखण्याची नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून वाहतूक नंदुरबार : लगतच्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे समाेर ...

मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून वाहतूक

नंदुरबार : लगतच्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे समाेर आले आहे. या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली किंवा कसे याबाबत मात्र माहिती नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील गुजरात हद्दीतून वाहने राज्यात येत आहेत.

पावसाळ्यापूर्वी मदत देण्याची मागणी

नंदुरबार : कोराेनामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातून गुजरात राज्यातील विविध भागात हंगामी शेतीकामे तसेच औद्योगिक कामांसाठी जाणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. यातील अनेक मजुरांना यंदा गुजरातमध्ये जाता आलेले नाही. या मजुरांना रोजगार नसल्याने त्यांना पावसाळ्यापूर्वी मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ देण्याची मागणी आहे.

व्यावसायिकांचे हाल

नंदुरबार : शहरातील विविध भागात दुपारी एक वाजेपर्यंत परवानगी असलेल्या विक्रेत्यांना व्यवसाय करण्याची परवानगी आहे. परंतु यात विविध वस्तू विक्रेते, इलेक्ट्रीक दुकानदार, कारागीर, गॅरेजवरचे कारागीर यांना बंदी असल्याने त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. त्यांना परवानगी देण्याची मागणी आहे.

आंबा आवक वाढली

नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात आंबा आवक वाढली आहे. परराज्यासह महाराष्ट्रातील आंबा बागांमधून आंबे विक्रीसाठी येथे आणले गेले आहेत. परंतु लाॅकडाऊन सुरू असल्याने आंबा विक्रीवर परिणाम होत आहे. यामुळे सकाळी सात वाजेपासूनच अनेक जण आंबे विक्री करत असल्याचे चित्र आहे.

जयचंद नगरात पुन्हा खड्डा खोदला

नंदुरबार : शहरातील काशिबा गुरव चाैकातून संतसेना चाैक गुरुकुल चाैफुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जयचंद नगरात पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटली होती. यातून याठिकाणी पुन्हा खोदकाम करण्यात आले आहे. या खाेदकामामुळे मार्गावरून ये-जा करणाऱ्यांना एकाच बाजूने रस्त्याचा वापर करावा लागत असल्याचे दिसून आले आहे.

वीज समस्या

अक्कलकुवा : तालुक्यातील मोलगीसह दुर्गम भागातील गावांमध्ये सध्या वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी कंपनीकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. याठिकाणी कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी तालुक्यातून करण्यात आली आहे.

तरसांची भीती

तळोदा : तालुक्यातील सिलींगपूर, प्रतापपूर, बोरद व छोटा धनपूर या परिसरात शेतशिवारात तरसांचा झुंड फिरत असल्याचे सांगण्यात आले आहे. सायंकाळनंतर हे वन्यप्राणी दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान पाण्यासाठी ही जनावरे या भागात आली असावीत, असा अंदाज आहे.

दुरुस्त्यांची मागणी

धडगाव : तालुक्यातील गाव-पाड्यांवर पाणीटंचाई वाढत आहे. यातून नादुरुस्त पडलेले हातपंप व पाणी योजनांची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आहे. दुरुस्त्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाने पथक निर्माण करण्याची मागणी आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये भीषण टंचाई आहे.

नालेसफाईला गती

नंदुरबार : नगरपालिकेच्यावतीने शहरातील विविध भागात नालेसफाई केली जात आहे. मान्सूनपूर्व साफसफाई अंतर्गत ही कारवाई सुरू आहे. यातून शहरातील विविध भागातील गटारी पूर्णपणे स्वच्छ केल्या जाणार असून शहरातील विविध भागात ही मोहीम गतिमान करण्यात आली आहे.