कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांना मिळणार आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST2021-05-18T04:31:03+5:302021-05-18T04:31:03+5:30

जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. कोविड प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यामधील ...

Children who have lost their parents due to corona will get support | कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांना मिळणार आधार

कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या बालकांना मिळणार आधार

जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली.

कोविड प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यामधील बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळाले पाहिजे. तसेच त्यांच्या यथायोग्य संगोपनाच्यादृष्टीने आवश्यक उपययोजना करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश मलिये, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, डॉ. अभिजित गोल्हार, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, चाईल्ड लाईन समन्वयक आशिष शेवाळे, बाल कल्याण समिती सदस्य नितीन सनेर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, जिल्हा परीविक्षा अधिकारी गिरीश जाधव आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयात चाईल्ड हेल्पलाईन क्र.१०९८ बाबत माहिती फलक लावण्यात यावेत, बालगृहाच्या ठिकाणी आरोग्य तपासणीसाठी पथक नेमावीत, सर्व संबंधित यंत्रणांनी कोविडमुळे आई-वडील गमावलेल्या मुलांच्या पालकांची माहिती पुढील बैठकीत सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. वंगारी यांनी कृती दलातील सदस्यांच्या जबाबदारीबाबत माहिती दिली.

Web Title: Children who have lost their parents due to corona will get support