शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
5
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
6
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
7
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
8
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
9
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
10
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
11
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
12
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
13
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
14
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
15
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
16
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
18
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
19
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
20
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

केमिकल भरलेले टँकर उलटल्याने चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : भरगाव येणारा टँकर उलटल्याने टँकर खाली दाबला गेल्याने आणि केमिकलमुळे भाजला गेल्याने चालकाचा जागीच ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : भरगाव येणारा टँकर उलटल्याने टँकर खाली दाबला गेल्याने आणि केमिकलमुळे भाजला गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावर प्रकाशापासून ३ किलोमिटर अंतरावर शुक्रवारी सायंकाळी घडली. या अपघातामुळे या महामार्गावर बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती.रहिमोद्दीन अलीहुसेन सिध्दीकी (३२) रा.गगजुली, जि.संतकबीर, उत्तरप्रदेश असे मयत चालकाचे नाव आहे. गुजरातकडून मध्यप्रदेशकडे केमिकल भरून टँकर (क्रमांक एमएच ४८ टी ८९२६) भरधाव जात असतांना तळोदा ते प्रकाशा दरम्यान प्रकाशापासून ३ किलोमिटर अंतरावर टँकर उलटला. अपघातामुळे जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून गेले. टँकर उलटल्यानंतर त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले. शिवाय चालकाच्या अंगावर देखील केमिकल पडल्याने त्यांचा भाजून मृत्यू झाला. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.घटनेची माहिती प्रकाशा गावाचे सरपंच सुदाम ठाकरे यांनी पोलिसांना कळविली. त्यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, अरुण सैंदाणे, गौतम बोराळे, सुनील पाडवी, सचिन तावडे, होमगार्ड तनवीर सय्यद घटनास्थळी पोहोचले. जेसीबी बोलवून टँकर उचलून बाजूला केले त्यातून चालकाला बाहेर काढले. त्यानंतर वाहतूक सुरळीत केली.प्रकाशा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अहिरे यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.