पाटबंधारे खात्याला काटेरी जाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 03:03 PM2020-01-20T15:03:22+5:302020-01-20T15:03:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील पाटबंधारे उपविभाग व इतर कार्यालयांच्या परिसर तसेच कर्मचारी निवासस्थानाच्या आवारात ...

Check the irrigation department | पाटबंधारे खात्याला काटेरी जाच

पाटबंधारे खात्याला काटेरी जाच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील पाटबंधारे उपविभाग व इतर कार्यालयांच्या परिसर तसेच कर्मचारी निवासस्थानाच्या आवारात काटेरी झुडपे वाढली आहेत. परिसराला समस्यांनी वेढले असतांनाही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा बसस्थानकाच्या मागील बाजूस प्रकाशा बॅरेजचे उपविभागीय कार्यालय आहे. त्याच्या मागील बाजूला गुणनियंत्रण उपविभाग, पाटबंधारे, मृद व जलसंधारण उपविभाग, तापी जलविद्युत उपविभाग अशी पाच कार्यालये आहेत. तसेच कर्मचाºयांना राहण्यासाठी ३२ निवासस्थानेही आहेत. या कार्यालयांच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे दर्शन होते. बॅरेज कार्यालयासमोर व मागील बाजूस पावसाळ्यात उगवलेली झाडेझुडपे तीने चार फुट एवढी वाढली आहेत. ही झाडेझुडपे तोडण्याची व साफसफाई करण्याची तसदीही संबंधितांकडून घेतली जात नाही. या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय नसून स्वच्छतागृह व शौचालयांचीही दुरवस्था झाली आहे. बाहेरून विविध दाखले घेण्यासाठी येणाºया शेतकºयांना बसण्यासाठीही व्यवस्था नाही. अशीच अवस्था याठिकाणी असलेल्या इतर कार्यालयांचीही आहे. येथील तीन एकर जागेत या पाच कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाºयांची निवासस्थाने आहेत. या निवासस्थान परिसरातही घाणीचे साम्राज्य आहे. कार्यालय व निवासस्थान परिसरातील पथदिवे बंद असल्याचे रात्रीच्यावेळी अंधार असतो. घाणीचे साम्राज्य, उगवलेले झुडपे, तुडूंब भरलेल्या गटारी त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव झाला आहे. स्वच्छतागृहाची दूरवस्था झाल्याने कर्मचाºयांसह विविध दाखल्यांसाठी येणाºया शेतकºयांनाही लघुशंकेसाठी बाहेर जावे लागते. म्हणजे सुविधा असूनही नसल्यासारखी स्थिती याठिकाणी आहे. येथे वराहांचा नेहमी वावर राहत असल्याने घाणीचे प्रमाण वाढले आहे. येथील कार्यालय व कर्मचारी निवासस्थान परिसरात नेहमी स्वच्छता राहण्यासाठी व इतर सुविधांसाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी येथे भेट देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.
येथील कार्यालयांमध्ये आस्थापनेवर असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांकडे इतर ठिकाणचाही अतिरिक्त पदभार आहे. त्यामुळे काही कर्मचारी शहादा, धुळे व इतर ठिकाणी कार्यरत आहे. काही कर्मचाºयांनी तर निव्वळ आदिवासी क्षेत्रातील भत्ता मिळावा यासाठी येथे नियुक्ती मिळवून इतरत्र प्रतिनियुक्तीवर काम करीत असल्याचे समजते. त्यामुळे अशा कर्मचाºयांची चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही करावी व असे प्रकार थांबविण्याची आवश्यकता आहे. बॅरेज उपविभागाचे मुख्य अभियंता के.एस. बांगर यांच्याकडे कामाचा व्याप जास्त आहे. इतर कार्यालयांचा भार त्यांच्याकडे असल्याने त्यांना बºयाचवेळेला धुळे येथेच राहावे लागते. आठवड्यातून फक्त दोन किंवा तीन दिवस ते प्रकाशा येथे येतात. त्यामुळे विविध दाखल्यांसाठी येणाºया शेतकºयांना वारंवार फिरफिर करावी लागते.

Web Title: Check the irrigation department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.