गावाचे नाव बदलल्याने ग्रामस्थ संभ्रमात

By Admin | Updated: April 14, 2017 16:12 IST2017-04-14T15:39:46+5:302017-04-14T16:12:57+5:30

गव्हाणीपाडा नाव असलेला गावाचा फलक बदलून त्याचे नाव गव्हानी करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आह़े

Changing the name of the village, villager confusion | गावाचे नाव बदलल्याने ग्रामस्थ संभ्रमात

गावाचे नाव बदलल्याने ग्रामस्थ संभ्रमात

 गव्हाणीपाडाचे झाले गव्हानी : ग्रामस्थांकडून नाराजी

सोमावल,दि.14- गव्हाणीपाडा नाव असलेला गावाचा फलक बदलून त्याचे नाव गव्हानी करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आह़े  
तळोदा तालुक्यातून जाणा:या अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्यमार्गास नुकताच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळून प्रत्यक्षात प्राथमिक कामास सुरुवातदेखील झाली आह़े महामार्गाला लागून असणा:या गावाच्या पाटय़ा नव्याने लावण्यात आल्या आहेत़ यात गव्हाणीपाडा नाव असलेली जुनी पाटी काढत नव्या पाटीवर गावाचे नाव बदलवून गव्हानी असे लिहण्यात आले असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आह़े यात नवीन पाटीवर गावाचे नाव बदलून त्या ठिकाणी गव्हानी नाव टाकण्यात आल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान याबाबत कुठलीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आह़े
(वार्ताहर)

Web Title: Changing the name of the village, villager confusion