चांदसैली शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात घोडा जागीच ठार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 13:12 IST2021-01-18T13:12:15+5:302021-01-18T13:12:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावाजवळच्या चांदसैली शिवारात  हिंस्त्र बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार झाल्याची घटना शनिवारी ...

In Chandsali Shivara, a horse was killed on the spot in a leopard attack | चांदसैली शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात घोडा जागीच ठार  

चांदसैली शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात घोडा जागीच ठार  

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावाजवळच्या चांदसैली शिवारात  हिंस्त्र बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. घोड्यावर हल्ला झालेल्या परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा नजरेस पडल्याने हा हल्ला बिबट्याने केला असावा असा अंदाज आहे. 
 चांदसैली शिवारातील राहुल राजेंद्र पाटील  शेतातील  घोड्यावर  बिबट्याने हा हल्ला केल्याची माहिती देण्यात आली आहे.  रविवारी दुपारच्या सुमारास शेतात फवारणी करणाऱ्या मजुरांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शेतकरी प्रवीण सुभाष पाटील यांना घटनेची माहिती दिली. ठार झालेल्या घोडा हरभ-याच्या शेतातुन लांब अंतरावर ओढून केळीच्या शेतात घेऊन जात त्याच्यावर ताव मारल्याचे चित्र दिसून आले.  जमिनीवर उमटलेले पायाचे ठसे हे बिबट्याचेच असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. सदर ठसे वनविभागामार्फत घेऊन तज्ज्ञांकडे पाठविल्यानंतरच या बाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.  ब्राह्मणपुरी परिसरात केळी पपईची मोठ्या प्रमाणात शेती करतात त्यात रब्बी पीक म्हणून हरभरे, गहू ची लागवड करण्यात आली आहे. या पिकांमध्ये हिंस्र प्राणी लपून बसत असल्याने शेतक-यांची तारांबळ होत आहे. 

Web Title: In Chandsali Shivara, a horse was killed on the spot in a leopard attack