शहादा येथील व्हॉलंटरी शाळेत मतदार दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST2021-02-05T08:08:38+5:302021-02-05T08:08:38+5:30

यावेळी संस्थेचे सचिव ॲड. राजेश कुलकर्णी, मुख्याध्यापिका ताराबाई बेलदार, प्राचार्या नयना पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी ...

Celebrate Voters Day at Voluntary School at Shahada | शहादा येथील व्हॉलंटरी शाळेत मतदार दिन साजरा

शहादा येथील व्हॉलंटरी शाळेत मतदार दिन साजरा

यावेळी संस्थेचे सचिव ॲड. राजेश कुलकर्णी, मुख्याध्यापिका ताराबाई बेलदार, प्राचार्या नयना पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मतदानाविषयी माहिती जाणून घेतली. प्रारंभी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली. मतदार व मतदान हे लोकशाहीमध्ये किती महत्त्वाचे आहे याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मतदान जनजागृती करणाऱ्या रांगोळ्या काढल्या. विजेत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात ॲड. राजेश कुलकर्णी यांनी सांगितले की, मतदान लोकशाहीने दिलेले सर्वात मोठे स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून आपला अधिकार बजावणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक मतदाराकडून मतदान होईल यासाठी सर्वांनी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही देखील तुमच्या पालकांना व नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे. सूत्रसंचालन कविता खैरनार यांनी तर आभार मोनिका कुवर यांनी मानले. यशस्वीतेसाठी संगीता पवार, अनिता पाटील, वर्षा तांबोळी, मोहिनी भवरे, सिद्धीका शेख, वंदना ढोडरे, विद्या बोरसे, ज्योती तिरमल, पंकज गुरव, किरण पाटील, श्रीकांत कुलकर्णी, तुषार बच्छाव, प्रवीण राठोड यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Celebrate Voters Day at Voluntary School at Shahada