गुड फ्रायडे व ईस्टर संडे सण साधेपणाने साजरे करा- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST2021-03-26T04:29:55+5:302021-03-26T04:29:55+5:30

ख्रिश्चन धर्मीय भाविक प्रार्थना सभेच्यावेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर करतील याकडे विशेष लक्ष द्यावे. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. ...

Celebrate Good Friday and Easter Sunday simply - Collector | गुड फ्रायडे व ईस्टर संडे सण साधेपणाने साजरे करा- जिल्हाधिकारी

गुड फ्रायडे व ईस्टर संडे सण साधेपणाने साजरे करा- जिल्हाधिकारी

ख्रिश्चन धर्मीय भाविक प्रार्थना सभेच्यावेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर करतील याकडे विशेष लक्ष द्यावे. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. चर्चच्या व्यवस्थापकांनी प्रार्थना सभेच्या ऑनलाईन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच या सणासाठी देण्यात येणारे संदेश समाजमाध्यमाद्वारे प्रसारीत करावे.

चर्चच्या बाहेर किंवा रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे किंवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा कार्यक्रमाचे आयोजन करू नये किंवा मिरवणूका काढू नये. या संदर्भात शासनाच्या विविध विभागांनी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. सण सुरू होण्यापूर्वी आणखी सुचना प्रसिद्ध झाल्यास त्याचेही पालन करावे. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी सुचनांचे उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Celebrate Good Friday and Easter Sunday simply - Collector