खुंटामोडीत स्रेहसंमेलन व वार्षिक पारितोषीक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:14 IST2020-02-16T13:14:02+5:302020-02-16T13:14:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माध्यमिक विद्यालय खुंटामोडी ता. धडगाव येथे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात आला. ...

Celebrate convention and annual award distribution | खुंटामोडीत स्रेहसंमेलन व वार्षिक पारितोषीक वितरण

खुंटामोडीत स्रेहसंमेलन व वार्षिक पारितोषीक वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : माध्यमिक विद्यालय खुंटामोडी ता. धडगाव येथे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यानिमित्त विविध स्पर्धाही घेण्यात आल्या.
कार्यक्रमात सरपंच गेमलसिंग वळवी, पं.स.सदस्य गोविंद पाडवी, संदिप वळवी, हिंदळामाता ट्रायबल एज्युकेशन सोसायटीचे सचिव गिरीश वसावे, एन.टी.पाटील, मुख्याध्यापक पृथ्वीराज पाटील, मुख्याध्यापक अनिल भावसार, लाईट आॅफ लाइफ ट्रस्टचे वसंत पावरा, मुख्याध्यापक प्रविण बोरसे, सुभाष राहसे, संजय वसावे, सुभाष पाडवी आदी उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. शिवाय चित्रकला, निंबध, वक्तृत्व, रांगोळी, खो-खो, कबडडी व विविध क्रिडा स्पर्धाही घेण्यात आल्या. चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक सेवानिवृत्त बॅँक मॅनेजर रायसिंग वळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.टी.पाटील, गिरीश ईशी, संभाजी तडवी हे होते.
रायसिंग वळवी यांनी आपल्या परिसरातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये. व त्यांनी स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. मुख्याध्यापक सुकलाल वळवी यांनी शाळेच्या उपक्रमांबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन दिलीप परमार यांनी केले. कार्यक्रमासाठी जात्या वळवी, दिलवरसिंग वळवी. प्रदिप सोनवणे विनायक वसावे, दिनकर गावित, मंगेश वळवी, तेरसिंग पराडके, रविंद्र शिंदे, चेतन बोरसे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Celebrate convention and annual award distribution