शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

बेडवरून उठताही येत नाही, घरी येऊन दिली जाणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

नंदुरबार : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना घराजवळील केंद्रावर किंवा घरी जाऊन लस देण्याबाबत राज्य शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहे. ...

नंदुरबार : दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना घराजवळील केंद्रावर किंवा घरी जाऊन लस देण्याबाबत राज्य शासनाकडून सूचना प्राप्त झाल्या आहे. स्थानिक पातळीवर त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. त्यामुळे अशा नागरिकांना हा एक दिलासा मिळणार आहे.

केंद्रांवर जाणे कठीण

जिल्ह्यात ज्येष्ठांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, अनेकांना केंद्रापर्यंत जाणे कठीण होत असल्याने लस घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याने अशा नागरिकांसाठी ही सुविधा करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी शासनाकडून याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेला पत्र प्राप्त झाले आहे. शिवाय याआधीही दिव्यांग व ज्येष्ठांच्या सोयीच्या लसीकरणासाठी त्यांच्या घराशेजारी किंवा स्वतंत्र सेशन अशा पद्धतीने स्थानिक पातळीवर नियोजन केले जात होते.

आता याबाबत सूचनाच प्राप्त झाल्या असून, याबाबत नव्याने काय करता येईल, याबाबत नियोजन सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात अद्यापही ३१ टक्केच ज्येष्ठ नागरिकांचे दोनही डोस घेऊन झालेले आहेत, तर ४५ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे उर्वरित ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करून घेणे प्रशासनासमोर मोठे आव्हान राहणार आहे.