नंदुरबार, शहाद्याहून धुळे, नाशिक, पुणे बस सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:31 IST2020-08-20T12:31:14+5:302020-08-20T12:31:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आंतरजिल्हा बस वाहतुकीला परवाणगी दिल्यानंतर नंदुरबार व शहादा आगारातून धुळे, नाशिक, पुणे शहरासाठी बससेवा ...

Bus starts from Nandurbar, Shahada to Dhule, Nashik, Pune | नंदुरबार, शहाद्याहून धुळे, नाशिक, पुणे बस सुरू

नंदुरबार, शहाद्याहून धुळे, नाशिक, पुणे बस सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आंतरजिल्हा बस वाहतुकीला परवाणगी दिल्यानंतर नंदुरबार व शहादा आगारातून धुळे, नाशिक, पुणे शहरासाठी बससेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार आगारातून गुरुवारी २६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात धुळेसाठी दर एक तासात बस सोडण्यात येणार आहे. याशिवाय नाशिकला देखील दर एक तासांनी बस सोडली जाणार आहे. पहिली बस धुळेसाठी सकाळी सात वाजता तर नाशिकसाठी आठ वाजता सोडली जाणार आहे. धुळेमार्गे पुणे आणि म्हसदीमार्गे पुणे बस साडेसात व आठ वाजता सोडण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना ते सोयीचे ठरणार आहे. याशिवाय शहादा आगारातून देखील देखील धुळे व नाशिकसाठी बसेस सोडल्या जाणार आहेत.
गुरुवारी प्रवाशांचा प्रतिसाद पाहून शुक्रवारपासून फेºया वाढविण्यास सुरुवात होणार आहे. नंदुरबार आगारातून मुंबईसाठी देखील बस सोडण्याचे नियोजन आहे.
बसमध्ये येणाºया सर्व प्रवाशांना सॅनिटाईझर सोबत आणणे आणि तोंडाला मास्क लावणे आवश्यक राहणार आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळूनच प्रवाशांना बसविण्यात येणार आहे.
बस सोडण्यााअधी प्रत्येक बस सॅनिटाईज करण्यात येणार आहे. आगारात येणारी बस देखील सॅनिटाईझ करण्यात येणार आहे. यामुळे एस.टी.कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Bus starts from Nandurbar, Shahada to Dhule, Nashik, Pune