शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्गाचा भार एकाच शिक्षकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील उर्दू शाळेत वर्षभरापासून एकाच शिक्षकावर शाळा सुरू असल्याने विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील उर्दू शाळेत वर्षभरापासून एकाच शिक्षकावर शाळा सुरू असल्याने विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत पंचायत समितीकडे सातत्याने शिषकांच्या नियुक्तीबाबत पाठपुरावा करूनही गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यामुळे संतप्त पालकांनी गुरूवारी थेट  पंचायत समिती गाठून सहायक गटविकास अधिका:यांना घेराव घातला. या वेळी पालकांनी अधिका:यांना चांगलेच धारेवर धरले होते. तत्काळ शिक्षक नियुक्त केल्याशिवाय कार्यालयातून बाहेर न जाण्याचा पवित्रा पालकांनी घेतल्यानंतर या अधिका:यांनी आठ दिवसाच्या आत दुसरा शिक्षक देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालकांनी ठिय्या मागे घेतला.शहरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळा क्रमांक तीन व चारसाठी एकाच शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या शाळांमधील साधारण 142 विद्यार्थी इयत्ता पहिली ते चौथीर्पयत शिक्षण घेत आहेत. तथापि या ठिकाणी एकच शिक्षक दिल्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण या एकाच शिक्षकावर पडत आहे. परिणामी ते पूर्णपणे   न्याय देऊ शकत नसल्याने आमच्या अल्पसंख्यांक विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मध्यंतरी या शाळेवर एका मराठी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकाची नियुक्ती केली होती. परंतु त्यांचीही इतरत्र बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर नियमानुसार दुस:या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे वर्षभरापासून या शाळा एकाच शिक्षकावर सुरू आहे, अशी वस्तुस्थिती असतांना जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग दखल घ्यायला       तयार नाही. शेवटी संतप्त पालकांनी गुरूवारी थेट पंचायत समितीचे कार्यालय गाठून सहायक गट विकास अधिकारी आर.बी. सोनवणे यांनाच घेरावर घातला. आमच्या विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत असतांना अधिकारी दाखल घेत नसल्यामुळे संतप्त पालकांनी अधिका:यांवर प्रश्नांची सरबत्ती करत तत्काळ दुसरा शिक्षक दिल्याशिवाय येथून ठिय्या मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. या वेळी सोनवणे यांनी पुणे येथे गेलेल्या शिक्षण अधिका:यांशी संवाद साधला. त्यांनी शाळेसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल केला असल्याचे सांगितले. शिवाय स्वत: त्यांनी आठ दिवसांच्या आत दुस:या शिक्षकांची नियुक्ती करण्याचे ठोक आश्वासन पालकांना दिल्यानंतर पालक तेथून माघाली आहेत. दरम्यान, एकच शिक्षक असल्यामुळे त्यांनाच अध्यापनाबरोबर इतर शैक्षणिक कामे ही करावे लागत असतात. साहजिकच त्याचा परिणाम विद्याथ्र्याच्या शिक्षणावर  होत असल्याचे पालकांनी सांगितले. आता आठ दिवस पुन्हा प्रतिक्षा करतो, अन्यथा शाळेलाच कायम कुलूप ठोकण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश चौधरी, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष इम्रान लियाकत, सांगीर राशिद काझी, सादीक सरदार शेख, सादिक सैय्यद, नाजीर खा पठाण, राजू अबू पिंजारी, मोहनीन खान पठाण, मोहसीन खाटीक, अकबर पिंजारी, अक्रम पिंजारी, इम्रान ईस्माईल, सकिना अरीफ शेख, आफरीन मन्यार, मोहनीस खाटीक, आदी पालक उपस्थित होते.