शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

सात क्वारंटाईन सेंटरसाठी इमारती अधीग्रहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : करोना विषाणूचा संसर्ग एका संक्रमीत रुगणाकडून अन्य इसमास होण्याची शक्यता विचारात घेता जिल्हाधिकारी तथा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : करोना विषाणूचा संसर्ग एका संक्रमीत रुगणाकडून अन्य इसमास होण्याची शक्यता विचारात घेता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार जिल्ह्यातील सात स्थळांचे क्वॉरंटाईन सेंटर म्हणून अधिग्रहण करण्याचे निर्देश दिले आहेत.पॉलिटेक्निक कॉलेज नंदुरबारमधील ३० खोल्या, सेवा सहकारी संस्थेचे कला, वाणिज्य महाविद्यालयाचे मुलांचे वस्तीगृह नवापूर येथे ४० खोल्या, सेवा सहकारी संस्थेचे कला, वाणिज्य महाविद्यालयाचे मुलींचे वस्तीगृह नवापूर ३० खोल्या, आदिवासी मुलांचे वस्तीगृह शहादा ८० खोल्या, आदिवासी मुलींचे वस्तीगृह खापर २४ खोल्या, आदिवासी मुलांचे वस्तीगृह आमलाड ता.तळोदा ४० खोल्या आणि आदिवासी मुलांचे वस्तीगृह मांडवी बु. ता.अक्राणी येथील ३० खोल्यांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आपत्तीच्या परिस्थितीत या ठिकाणी करोना विषाणूच्या संशयित रुग्णास अलगिकरण करून निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (कोव्हीड-१९) उपायोजना नियम २०२० नुसार कायदेशिर कार्यवाहीस पात्र राहील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

४करोना विषाणूचा संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ३१ मार्च पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील परमिट रुम, वाईन शॉप, बियर शॉपी, मोह फुलांचे विक्री केंद्रे, देशी दारू आदी ठोक आणि किरकोळ विक्रेते यांच्या आस्थापना बंद राहतील. किरणा दुकान, मेडीकल स्टोअर्स, गॅस पुरवठा, दुधाची दुकाने आणि तत्सम जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, मेस येथे बसून जेवण करण्यास बंदी टाकण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, मेस केवळ तयार अन्नाचे पार्सल विक्री करू शकतील. आदेशाचे संबंधितांनी पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.४जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समिती ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत बाजार समिती अध्यक्ष, सचिव व संचालक यांनी तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नंदुरबार यांनी आदेशाचे पालन करावे. शेतकऱ्यांनी या काळात कुठलाही शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये. भुसार मालासह भाजीपाला मार्केटसाठी देखील हे नियम लागू राहणा आहेत.