शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वधूपित्यांचा जीव पुन्हा टांगणीला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:42 IST

ब्राह्मणपुरी : मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीने सर्व सोहळे, कार्यक्रम रद्द; तर कुठे साध्या पद्धतीने करण्याची वेळ ...

ब्राह्मणपुरी : मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीतीने सर्व सोहळे, कार्यक्रम रद्द; तर कुठे साध्या पद्धतीने करण्याची वेळ आली होती. आता पुन्हा शहरी भागासह ग्रामीण भागांतही कोरोनाची भीती वाढली असताना व प्रशासनाकडून विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे सद्य:स्थितीत सुरू असलेल्या विवाह सोहळ्यातील वधूपित्याला मात्र चिंता लागली असून, त्यांचा जीव टांगणीला लागला असल्याचे चित्र दिसत आहे.

कोरोनाकाळात टाळेबंदीमुळे अनेक लग्नसोहळे रद्द झाले. लग्नासाठी करण्यात आलेल्या सर्व तयारीवर पाणी फिरले. सगळी हौस, उत्साह बाजूला ठेवून ठरलेली लग्नतिथीही टळली. यामुळे वधू-वरासह सर्वच नाराज झाले. त्यातच काही वधूपित्यांना आपल्या मुलीचा विवाह सोहळा धूमधडाक्यात व्हावा ही मनोमन इच्छा होती; परंतु कोरोनामुळे काहीच जमले नाही. ठरलेल्या तिथी पुढे ढकलण्यात आल्या. दिवाळीनंतर यातील बरेच लग्नसोहळे उरकून घेण्यात आले. उर्वरित लग्नकार्य आता पुन्हा सुरू होताच मागील आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने प्रशासनाच्या वतीने अनेक नियम व निर्बंध घालण्यात येत आहेत. त्यात पुन्हा मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर, जमावबंदी टाळणे यांसह रात्रीचे घालण्यात आलेले निर्बंध यांमुळे पुन्हा एकदा नियोजित विवाह सोहळ्याच्या वधूपित्याचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच आता फेब्रुवारी व मार्चमध्ये असलेल्या लग्नतिथी व विविध कार्यक्रमांवर निर्बंध असल्याने संकट निर्माण झाले आहे. यामुळे वर्षभराच्या कालावधीत पुन्हा कोरोनामुळे वधूपित्यांसह अनेकांचा जीव टांगणीला लागला असून, सर्वसामान्यांना पुन्हा लॉकडाऊन लागून घरी बसावे लागणार की काय, असा प्रश्न आहे.

ऐन लग्नसोहळ्यात कोरोनाची धास्ती

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची धास्ती लग्नसोहळ्यात कमी झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे नागरिकांच्या दुर्लक्षामुळे मास्क वापरणे बंद झाले. परिणामी कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने नाइलाजाने प्रशासनाला लग्नसोहळ्यासह इतर कार्यक्रमांत निर्बंध लावण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.