दारू पिऊन वाहन चालविल्याने दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:29 IST2021-03-26T04:29:59+5:302021-03-26T04:29:59+5:30

नंदुरबार : दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी दोन दुचाकी चालकांवर नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील ...

Both were charged with driving under the influence of alcohol | दारू पिऊन वाहन चालविल्याने दोघांवर गुन्हा दाखल

दारू पिऊन वाहन चालविल्याने दोघांवर गुन्हा दाखल

नंदुरबार : दारू पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी दोन दुचाकी चालकांवर नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील हॅाटेल आशीर्वादच्या पुढे पोलिसांनी ही कारवाई केली. रनाळे येथील विकास दत्तात्रय भोसले हे आपल्या दुचाकीवर (क्रमांक जीजे १९ क्यू २८५३) जात असतांना त्यांची पोलिसांनी तपासणी केली. त्यावेळी ते दारूच्या अमलखाली असल्याचे लक्षात आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

दुसरी कारवाई देखील याच ठिकाणी करण्यात आली. शांताराम बुधा दोरीक, रा.भामपूर, ता.शिरपूर हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एमएच १८-झेड २२७२) दोंडाईचाकडे जात होते. यावेळी तेथे असलेल्या पोलीस पथकाने त्यांची तपासणी केली. त्यात त्यांनी दारू पिल्याचे आढळून आले.

याबाबत पोलीस कर्मचारी साहेबराव जाधव यांनी फिर्याद दिल्याने तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार धनगर करीत आहे.

Web Title: Both were charged with driving under the influence of alcohol