शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा येथे दोन्ही भावांचे आठ दिवसाच्या अंतराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST

सविस्तर वृत्त असे की, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ या म्हणीला खोटं ठरवणारी घटना प्रकाशा येथे घडली. प्रकाशा ...

सविस्तर वृत्त असे की, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’ या म्हणीला खोटं ठरवणारी घटना प्रकाशा येथे घडली. प्रकाशा येथील विजय मदन चौधरी (वय ५८) व लक्ष्मण मदन चौधरी (६२) हे दोघे भाऊ गावाच्या नागबरडा येथे राहत होते. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता. त्यामुळे गावात हे दोघे भाऊ एकाच मोटारसायकल फिरत शेतीची कामे करत असत. एवढेच नव्हे, तर गावात किराणा, भाजीपाला घेण्यासह परिवारातील सुख-दु:ख, लग्नसमारंभ, पूजापाठ सर्व कार्यक्रमांना सोबतच फिरायचे. त्यामुळे दोन्ही भावांची जोडी प्रसिद्ध होती. ‘शोले’मधील जय आणि वीरूसारखी या भावांची पक्की मैत्री होती. बालपणापासून तर वयाच्या ५५-६० वर्षांपर्यंत एकमेकांची सावली बनून राहिले. दोघांचा स्वभाव शांत, मनमिळाऊ, होता. त्यामुळे गावात कोणाजवळ भांडण नव्हतेच. एक महिन्यापूर्वी लक्ष्मण चौधरी यांच्या मुलीची मुलगी म्हणजे नातीचा विवाह सारंखेडा येथे झाला. या सुखदप्रसंगी दोघा भावांच्या परिवाराने या विवाहाला उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले होते. या सुखदप्रसंगी कोणालाही जाणवले नाही की, त्यांच्या घरी एक महिन्याभरानंतर एवढा दुःखद प्रसंग येणार आहे. विजय चौधरी यांचा दुर्धर आजारावर औषधोपचार सुरू असताना २७ मार्च रोजी निधन झाले. या घटनेला आठ दिवस होत नाही तोच ३ एप्रिल रोजी म्हणजे त्यांचे मोठे बंधू लक्ष्मण मदन चौधरी यांचेही अचानक निधन झाले. दोन्ही भावांच्या निधनाच्या घटनेने कुटुंब सुन्न झाले आहे. दोन्ही भावांनी बालपण, शिक्षण, शेती व्यवसाय, संसार सर्व सोबतच केला आणि जगाचा निरोप घेतानाही सोबतच गेले.