शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बोरद आरोग्य केंद्रात २९ गावांचा भार अवघ्या १६ कर्मचाऱ्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST

कर्मचाऱ्यांना बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सात उपकेंद्रात जावे लागते. तरी जवळपास ४२ हजार लोकसंख्या या आरोग्य केंद्राला जोडले ...

कर्मचाऱ्यांना बोरद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सात उपकेंद्रात जावे लागते. तरी जवळपास ४२ हजार लोकसंख्या या आरोग्य केंद्राला जोडले आहे. मात्र कामाचा मोठा भार फक्त येथील १६ कर्मचाऱ्यांना उचलावा लागत आहे.वास्तविक या प्राथमिक आरोग्य केंद्रात दरदिवशी शंभरपेक्षा अधिक रुग्ण उपाचार घेत असतात. त्याच बरोबर आरोग्य केंद्रात नियमित संतती शस्त्रक्रिया करण्यात येतात. परिसरातील तीस ते चाळीस महिलांची प्रसूती केल्या जात असून दरमहा लसीकरण करण्यात येत असते. गेल्या वर्षापासून कोरोना महामारीची भयावह परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारीची इतरत्र बदली करण्यात आली असल्याने जुन्या जागी नवीन कर्मचारी देण्यात आले नसल्याने उलट कोरोना महामारीत काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज असताना कर्मचाऱ्यांची इतर ठिकाणी बदली करण्यात येत आहेत.

राज्य शासनाने मानधन तत्वावर कर्मचारी नियुक्त करण्याची घोषणा केली असून तळोदा तालुक्यात कंत्राटी कर्मचारी नियुक्तीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे आरोप होत आहे. बोरद केंद्रात कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत सतत वरिष्ठाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र या अहवालाला केराची टोपली दाखवण्यात येत असल्याने निदान मानधन तत्त्वावर तरी प्रशासनाने नियुक्तीचा मार्ग मोकळा करावा,अशी मागणी होत आहे.

लाखापूर उपकेंद्रात डॅाक्टरच नाही

बोरद प्राथमिक केंद्र अंतर्गत लाखापूर येथे आरोग्य उपकेंद्र सुरू असून सदर उपकेंद्रात परिसरातील दुर्गम गाव, पाड्यातील नागरिक उपचाराकरिता येतात. परंतु येथील वैद्यकीय अधिकारीची जागा रिक्त असल्याने इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर काम भागवावे लागत आहे. वास्तविक दुर्गम भागातील हे उपकेंद्र असल्यामुळे येथे कायमस्वरूपी नियमित डॉक्टरची आवश्यकता आहे. तरीही नियमित अधिकारी दिला जात नसल्याची व्यथा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

ग्रामीण रुग्णालयांची मागणी

या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी परिसरातील नागरिकांनी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र त्याकडे अजूनही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात नसल्याने येथील ग्रामीण रुग्णालयांचा प्रश्न कायम आहे. त्या बरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था झाली असून कमी जागेमुळे आरोग्य केंद्रातील शिबिरे बाहेर घ्यावी लागत आहे.