अपहृत बालिकेचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 12:50 PM2021-01-24T12:50:50+5:302021-01-24T12:50:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गेल्या पाच दिवसंपासून कढेल ता. तळोदा येथून अपहरण झालेल्या ऊसतोड मजुराच्या दहा वर्षीय जखमी ...

The body of the abducted girl was found | अपहृत बालिकेचा मृतदेह आढळला

अपहृत बालिकेचा मृतदेह आढळला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : गेल्या पाच दिवसंपासून कढेल ता. तळोदा येथून अपहरण झालेल्या ऊसतोड मजुराच्या दहा वर्षीय जखमी बालिकेचा मृतदेह गुजरात मधील पिसावर शिवारातील दादरचा शेतात आढळून आला. तिच्या मृतदेहाचे निजर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आता पोलिसांपुढे संशयीतांना शोधण्याचे आव्हान आहे.  
धडगाव तालुक्यातील काकर्दाचा घाटली आसरीपाडा येथील  ऊसतोड मजूर तळोदा तालुक्यातील कढेल शिवारात उतरले आहेत. हे मजूर आपल्या पाढाव असलेल्या ठिकाणाहून मंगळवारी सकाळी दुसऱ्या उसाच्या क्षेत्रात ऊस तोडणी साठी जात होते. त्याचवेळी मुन्नी मोत्या पटले ही दहा वर्षीय बालिका रस्ता ओलांडून पलीकडच्या शेतात जात असतांना तिला भरधाव दुचाकीने धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. दवाखान्यात नेत असल्याचे सांगून दुचाकीस्वाराने तिला नेले. परंतु नंतर ती सापडलीच नाही. शोधाशोध केल्यानंतर तळोदा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विविध पथकांद्वारे बालिकेचा शोध घेतला जात होता. त्याच दरम्यान, शनिवारी सकाळी  पिसावार गावातील मजूर कामासाठी शेतात जात असताना त्यांना जवळच्या दादरच्या शेतात मृतदेहाच्या उग्रवास आला. त्यांनी पिसावर गावाच्या सरपंचास ही माहिती दिली. ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खात्री केल्या नंतर  तळोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नंदलाल पाटील यांना कळविले. बालिकेच्या मृतदेहाचे शव विच्छेदन निझर येथील उपजिल्हा रुग्णलयात करण्यात आले. आपल्या पोटाच्या गोळ्यां चा मृतदेह पाहून तिच्या आई,वडिलांनी एकच हंबरडा फोडला होता. आता संशयीतांपर्यंत पोहचण्याचे आव्हान पोलिसांपुढे  आहे. 

Web Title: The body of the abducted girl was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.