शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री राठोड यांच्यावर कारवाईसाठी भाजप महिला मोर्चाचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:59 IST

नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवर शनिवारी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ...

नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवर शनिवारी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे या मागणीसाठी सकाळी साडेअकरा वाजता महिला जिल्हाध्यक्ष किन्नरी सोनार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सहभागी महिलांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलक महिलांना पोलिसांना ताब्यात घेऊन अटक केली त्यानंतर काही कालावधीत सुटका केली.

याबाबत जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूजा चव्हाण या तरुणीचा संशयास्पद मृत्यूप्रकरणी मंत्री राठोड यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करावा. पूजा चव्हाणचा ७ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला पूजाच्या मृत्यूला १९ दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी या घटनेबाबत प्राथमिक अहवालदेखील दाखल केला नाही. पूजाच्या ऑडिओ क्लिपमधील संवाद संबंधित व्यक्तींची पोलिसांनी साधी चौकशीही केली. पोलीस हाताची घडी तोंडावर बोट ठेवत गप्प बसले आहेत. याचा अर्थ पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष किन्नरी सोनार, प्रदेश सदस्य सविता जयस्वाल, शहराध्यक्ष योगिता बडगुजर, नगरसेविका संगीता सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष सपना अग्रवाल, मनीषा निकम, भावना लोहार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

*चौकट*

एका तरुणीच्या मृत्युकडे इतक्या असंवेदनशील

पद्धतीने पाहिले जात आहे याची खंत वाटते. पूजा चव्हाणच्या मृत्युबाबत जे पुरावे बाहेर आले आहेत. त्या सर्व पुराव्यांतून या प्रकरणाशी वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध आहे हेच दिसून येते. मात्र, सरकारकडून मंत्री राठोड यांना अभय दिले जात असल्याचेही दिसून येते आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा तातडीने राजीनामा घ्यावा. राजीनामा दिला नाही तर त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे. राठोड यांचा राजीनामा घेतला जात नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू.

-किन्नरी सोनार

जिल्हाध्यक्ष, महिला मोर्चा, भाजप.