शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात महामार्गावर चार ठिकाणी अंडर बायपास करावा- भाजपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:45 IST

निवेदनाचा म्हटले आहे की, नवापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गामुळे शहरातील देवळफळी भागातील वस्ती बाधित होणार आहे. वीज वितरण कंपनीच्या ...

निवेदनाचा म्हटले आहे की, नवापूर शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्गामुळे शहरातील देवळफळी भागातील वस्ती बाधित होणार आहे. वीज वितरण कंपनीच्या समोर, आदर्शनगर, शांतीनगर, प्रभाकर कॉलनी, देवळफळी, इस्लामपुरा व नवापूर पालिका हद्दीतील खाकरफळी येथील सर्व परीसरात नागरिकांना अडचणी निर्माण होणार आहेत. नवापूर पालिकेने २६ ऑक्टोबर २०२० ला देवळफळी परिसरातील रस्त्यालगतच्या ६९ व्यावसायिक व रहिवासी यांना नोटिसाद्वारे कळविण्यात आले आहे की. राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाऱ्या ६९ कुटुंबीयांनी आपापली घर व दुकाने स्वतःहून काढून घ्यावे. शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ चे काम गतीने चालू झाले असून देवळफळी परीसरातील रस्त्याला लागून रहिवासी वस्ती ही गेल्या ५० वर्षांपासून नवापूर नगरपालिकेचा भोगवटदारांच्या नावे वेळोवळी कर भरलेला आहे. ते सर्व ६९ कुटुंब उघड्यावर येणार आहेत. यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. राहण्याचे व व्यावसायिक साधन उरणार नाही, सर्व कुटुंबांची माणुसकीच्या नात्याने भावना लक्षात घेऊन ज्या कुटुंबानी मोलमजुरी करून जे काही तोडकंमोडकं घरं बांधली आहेत. अशा सर्वाना पर्यायी जागा नवापूर नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी.

नवापूर शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोरुन ८० फुटी डी.पी. रोड मंजूर असून त्या डी.पी. रोडला जोडण्यात आलेले आदर्शनगर , रंगेश्वर पार्क, गोविंद वेडू नगर, गणेश हिल, लाखाणी पार्क, व उपजिल्हा रुग्णालयात तसेच वीज वितरण कंपनी येथून नागरिकांना ये-जा करीत असल्याने या सर्व परिसरातील नागरिकांना शहरातून या वस्तीत जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्र.६च्या नियोजनात या रस्त्याला जोडण्यासाठी बोगदा अथवा इतर कोणतीच सुविधा नसल्याने नागरिकांना जीव धोक्यात घेऊन थेट महामार्ग ओलांडावा लागणार आहे. जनतेचा हिताचा विचार करून बोगदा करण्यात यावा. अन्यथा भारतीय जनता पार्टी नवापूरच्या वतीने जनतेच्या हितासाठी रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. निवेदनावर भारतीय जनता पाटीचे तालुकाध्यक्ष भरत गावीत, प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक मोर्चा एजाज शेख, प्रदेश सचिव आदिवासी आघाडी अनिल वसावे, जयंतीलाल अग्रवाल, जाकीर पठाण, अजय गावीत, जितेंद्र अहिरे, हेमंत जाधव, दिनेश चौधरी,अल्लाखाँ शाह,नगरसेवक महेंद्र सोनार,माजी नगरसेवक रमेश राणा, भीमसिंग गावीत, तालुका कोषाध्यक्ष कमलेश छत्रीवाला, नीलेश प्रजापत,सौरव सोनार,कल्पेश अग्रवाल आदीच्या सह्या आहेत.

कोट......

पर्यायी जागा उपलब्ध नाही

नवापूर शहरातील देवळफळी भागात ६९ घर आहेत. सदरची घरे ही नवापूर नगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आले आहे. जागेवर महामार्ग रुंदीकरण प्रस्तावित असून या अनुषंगाने ६९ कुटुंब विस्तापित होणार आहे. पर्यायी जागा पालिकेकडे उपलब्ध नाही. घरकूल योजनेतून घर बांधकामासाठी जागेचा शोध सुरू आहे.

-महेश चौधरी, मुख्याधिकारी, नगरपालिका,नवापूर

इन्फोबॅाक्स...

शहरातील ठिकठिकाणी महामार्ग बोगदे

नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनी तसेच इस्लामपुरा या भागातील नागरिकांना बाजारपेठ, बँक, शाळा व विविध गरजांसाठी शहरात ये-जा करावे लागते यासाठी या ठिकाणी देखील बोगदा करण्यात यावे. नवापूर शहरातील शिवराम पाटील नगर या ठिकाणाहून खाकरफळी येथे जाण्यासाठी नागरिकांना अडचणीचे ठरणार असून या भागातून नवापूर शहरातील व गुजरात राज्यातील नागरिक यांना ये-जा करण्यासाठी मुख्य रस्ता असून या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या नियोजनात बोगदा नसल्याने सदर नागरिकांच्या व रहदारीचा विचार करून त्या ठिकाणी बोगदा करण्यात यावा.

विद्यार्थ्यांना शाळेत व महाविद्यालय जाण्यासाठी अडचण

शहरातील व परिसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना शाळा,दवाखाने,व बाजारपेठ दैनंदिन गरजा भागविण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना अडचणी या मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत,व शहर दोन भागात विभागले जाणार असल्याचे दिसत आहे. सर्व ठिकाणी बोगदे करणे तसेच देवळफळी परिसरातील बाधित होणारी घरे व व्यावसायिक दुकानांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.