शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

भाजप स्वबळावर लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 11:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत भाजप सर्व जागा लढवण्यास सज्ज असून पक्ष स्वबळावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत भाजप सर्व जागा लढवण्यास सज्ज असून पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांनी केले़ सिंधी कॉलनीतील गुरुनानक वाडीत झालेल्या कार्यकर्ता मेळावा व इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते़प्रसंगी आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, डॉ़ शशिकांत वाणी, प्रदेश सदस्य नागेश पाडवी, राजेंद्रकुमार गावीत, व्यंकटराव पाटील, जयपालसिंह रावल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते़ प्रारंभी कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार डॉ़ गावीत यांनी सांगितले की, भाजप कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही़ म्हणून स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार आहे़ जिल्ह्यातील गट व गणातून जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करुन तो निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा़ जिल्हा परिषदेत सत्ता आल्यानंतर ग्रामीण भागात केंद्राच्या योजना आणून विकास करण्यात येईल, यासाठी सर्वांनी केंद्राच्या योजनांचा प्रसार करावयाचा आहे़जिल्हाध्यक्ष चौधरी यांनी सर्वच गट व गणात उमेदवार देऊन त्यांना विजयी करुन आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे सांगितले़सर्व ५६ गट आणि ११२ गणात इच्छुक उमेदवारांनी मुलाखती देत निवडणूकीसाठी केलेल्या तयारीचा आढावा सादर केला़ सर्व सहा तालुक्यातील गट व गणांसाठी मुलाखती घेण्यात आल्या़