बाईक ॲब्युलन्सचा प्रयोग राज्यातील इतर जिल्ह्यातही राबविणार - पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:29 IST2021-05-23T04:29:34+5:302021-05-23T04:29:34+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, ...

Bike ambulance experiment will be implemented in other districts of the state too - Guardian Minister | बाईक ॲब्युलन्सचा प्रयोग राज्यातील इतर जिल्ह्यातही राबविणार - पालकमंत्री

बाईक ॲब्युलन्सचा प्रयोग राज्यातील इतर जिल्ह्यातही राबविणार - पालकमंत्री

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जि.प.चे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, दिलीप नाईक आदी उपस्थित होते.

या बाईक ॲम्ब्युलन्ससाठी एकूण ६६ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून त्यात दोन वर्षांसाठी चालक, देखभाल व दुरुस्ती, चालकाचे मानधन, प्रशिक्षण आदी खर्चाचा समावेश आहे. नीती आयोगाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी उपयोगात या आणल्या जाणार आहेत.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाडवी म्हणाले, नंदुरबारप्रमाणे गडचिरोली, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील दुर्गम आदिवासी भागात बाईक ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक निधी आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येईल.

अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील दुर्गम भागासाठी या रुग्णवाहिकांचा उपयोग करण्यात येणार आहे. या भागातील नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका उपयुक्त ठरतील. डोंगराळ भागात आरोग्य सुविधा देण्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Bike ambulance experiment will be implemented in other districts of the state too - Guardian Minister