ऑनलाइन गृहप्रवेश कार्यक्रमात सावळदा येथील लाभार्थींचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST2021-06-18T04:22:10+5:302021-06-18T04:22:10+5:30

शहादा तालुक्यातील सावळदा, मडकाणी, तिखोरा, रामपूर या गावात बांधण्यात घरकूल लाभार्थींना गृहप्रवेश देऊन घराच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या. प्रातिनिधिक ...

Beneficiaries from Savalda are included in the online housing program | ऑनलाइन गृहप्रवेश कार्यक्रमात सावळदा येथील लाभार्थींचा समावेश

ऑनलाइन गृहप्रवेश कार्यक्रमात सावळदा येथील लाभार्थींचा समावेश

शहादा तालुक्यातील सावळदा, मडकाणी, तिखोरा, रामपूर या गावात बांधण्यात घरकूल लाभार्थींना गृहप्रवेश देऊन घराच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या. प्रातिनिधिक स्वरूपात सावळदा येथील सरपंच वैशाली दिलीप पाटील यांच्या हस्ते चाव्या देण्यात आल्या. या वेळी गृहनिर्माण अभियंता दिग्विजय शर्मा, गणेश शर्मा, ग्रामसेवक एस.ए. पाटील, उपसरपंच शांतीलाल मोनू पवार, ग्रामपंचायत सदस्य धनसिंग तुला पवार, मनीषा दिलीप गिरासे, हिराबाई मुसळदे, प्रदीप अरुण पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी योगेंद्र लोटनसिंग गिरासे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन ई-गृहप्रवेश कार्यक्रमात सावळदा गावाचे नाव निश्चित करण्यात आल्याने आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यासाठी आम्ही उत्कृष्ट व सुव्यवस्थित बांधकाम करून लाभार्थींना गृहप्रवेश करून दिले. लाभार्थींचे घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने लाभार्थींबरोबर गावाचाही नावलौकिक झाला याचा सार्थ अभिमान वाटतो.

-वैशाली पाटील, सरपंच, सावळदा ग्रामपंचायत

Web Title: Beneficiaries from Savalda are included in the online housing program