शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना खुणावतेय तोरणमाळचे निसर्ग सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील दुस:या क्रमांकांचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे पर्यटक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे राज्यातील दुस:या क्रमांकांचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे पर्यटक हजेरी लावून ‘वर्षा पर्यटना’चा आनंद लुटत आह़े शनिवार आणि रविवार अशा सलग दोन दिवसांच्या सुटीमुळे येथे पर्यटकांची गर्दी झाली होती़  तोरमणमाळ येथे पावसाळ्यात निसर्गसौंदर्य खुलत असल्याने जुलै ते नोव्हेंबर दरम्यान पर्यटकांचा वावर असतो़ यंदा पावसाने उशिरा हजेरी दिल्याने जुलैमध्यार्पयत पर्यटक या भागात फिरकले नव्हत़े परंतू गत दोन आठवडय़ापासून सातपुडय़ात मुसळधार पाऊस होत आह़े यातून तोरणमाळ आणि परिसरातील निसर्ग हिरवागार होऊन लहान मोठे धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत़ परिणामी तोरणमाळला वर्षा पर्यटनासाठी येणा:या हौशी पर्यटकांची गर्दी वाढत होती़ यातच शनिवार आणि रविवार अशी सलग दोन दिवस सुटी असल्याने पर्यटकांची गर्दी झाल्याचे दिसून आल़े सिताखाई, यशवंत तलाव, कमळ तलाव, मच्छिंद्रनाथ गुफा, गोरक्षनाथ मंदिर यासह ठिकठिकाणी पर्यटक हजेरी लावून पावसात फिरण्याचा आनंद लुटत असल्याचे दिसून आले आह़े पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे तोरणमाळ येथील छोटय़ामोठय़ा व्यवसायांना गती आली असून खाद्यपदार्थ विक्रेते आणि निवास व्यवस्थेचे व्यवसाय तेजीत आल्याची माहिती देण्यात आली आह़े सातपुडय़ाच्या दुर्गम भागात पाऊस कोसळत असल्याने छोटे ओढे व नाले भरुन वाहू लागल्याने यशवंत तलावाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आह़े तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर सिताखाई धबधबा ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने अनेक जण हा क्षण टिपण्यासाठी येथे मुक्कामी थांबून असल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील पर्यटक याठिकाणी हजेरी लावत असल्याने सातपायरी घाटात दुचाकी आणि चारचाकी वाहने दिसून येत आहेत़ पावसाचा जोर कायम राहिल्यास येत्या दिवसात पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आह़े 

पर्यटकांसोबतच गत दोन दिवसात शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही भेटी दिल्याची माहिती आह़े येथील वनविभागाचे विश्रामगृह आणि खाजगी हॉटेल्समध्ये पर्यटकांची समाधानकारक स्थिती असल्याचे दिसून आले होत़े पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलीस दल आणि आरोग्य विभागाने येथे कर्मचा:यांना सतर्कता बाळगून सेवा पुरवण्याचे सांगितले आह़े एसटी महामंडळाकडूनही मिनीबसेस सुरु करण्यात आल्याने युवा वर्गाची मोठी गर्दी दिसून येत आह़े यशवंत तलाव परिसरात भटकंती करणा:यांची संख्या वाढत आह़े रविवारी मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीचा अनुभव स्थानिकांना आला़ 

तोरणमाळ मंडळात जुलैअखेरीस 82़.6 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आह़े जून महिन्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे मंडळातील सर्वच गावांत हिरवळ दाटून आल्हादायक वातावरण निर्माण झाले आह़े