वेतनाची मागणी केल्याने माय-लेकराला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:10 IST2020-05-13T12:10:35+5:302020-05-13T12:10:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील नवलपूर येथे जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाक मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेसह तिच्या ...

Beating My-Laker for demanding salary | वेतनाची मागणी केल्याने माय-लेकराला मारहाण

वेतनाची मागणी केल्याने माय-लेकराला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा तालुक्यातील नवलपूर येथे जिल्हा परिषद शाळेत स्वयंपाक मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेसह तिच्या मुलाला तिघांनी मारहाण केली़ पिडित महिला १४ महिन्यांपासून न मिळालेले वेतन मागण्यासाठी गेली होती़ रविवारी ही घटना घडली़
पद्माबाई वसंत ठाकरे व मिथुन वसंत ठाकरे या दोघांना मारहाण करण्यात आली़ त्यात ते जखमी झाले़ रविवारी पद्माबाई ह्या संतोष भामटा ठाकरे, रविंद्र संतोष ठाकरे, ब्रिजलाल भामटा ठाकरे, रेमसिंग ठाकरे यांच्याकडे पैसे घेण्यासाठी गेल्या होत्या़ परंतू त्यांना मारहाण झाली़ याबाबत म्हसावद पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे़

Web Title: Beating My-Laker for demanding salary