ऊस काढण्यास मनाई केल्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 13:16 IST2020-12-25T13:16:32+5:302020-12-25T13:16:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  ऊस काढण्यास मज्जाव केल्याचे वाईट वाटून एकास दगडाने मारून जखमी केले. शिवाय दुचाकीची तोडफोड ...

Beaten for refusing to remove sugarcane | ऊस काढण्यास मनाई केल्याने मारहाण

ऊस काढण्यास मनाई केल्याने मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  ऊस काढण्यास मज्जाव केल्याचे वाईट वाटून एकास दगडाने मारून जखमी केले. शिवाय दुचाकीची तोडफोड केल्याची घटना मिरानगर, शहादा येथे घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
गोरा फरिदखान पठाण, रा.मिरानगर असे संशयीताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, शिवा रोहिदास भिल, रा.भादे, ता.शहादा हे आपल्या वाहनाने ऊस नेत असतांना गोरा पठाण यांनी ऊस काढण्याचा प्रयत्न केला. त्याचे वाईट वाटून दगड मारून जखमी केले. तसेच शिवा यांचा भाऊ यांच्या दुचाकीचे लाईट फोडून नुकसान केले. 
याबाबत शिवा भिल यांनी फिर्याद दिल्याने गोरा पठाण यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार विक्रम कचरे करीत आहे. 

Web Title: Beaten for refusing to remove sugarcane