शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी प्रय}शील राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  मागास जिल्हा अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख पुसून नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी लोकाभिमुख आणि जलद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  मागास जिल्हा अशी नंदुरबार जिल्ह्याची ओळख पुसून नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी लोकाभिमुख आणि जलद प्रशासन देण्याचा प्रय} करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज नाटय़गृहात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, दत्तात्रय बोरुडे, सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, धनंजय निकम आदी उपस्थित होते. भारुड म्हणाले, सामान्य माणसाच्या अपेक्षा पूर्ण केल्यास महसूलविभागाची प्रशासनाचा कणा म्हणून असलेली ओळख अधिक स्पष्ट होईल. कार्यालय स्वच्छ आणि सुंदर ठेवताना अभ्यागतासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. विनय गौडा म्हणाले, शासनाचे महत्वाचे असे नियंत्रक आणि विकासात्मक काम महसूल विभागाकडून होते. आपली कामे जलदगतीने केल्यास जनतेचा शासनावरचा विश्वास अधिक दृढ होतो. पंडीत म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विभागांनी एकत्रितरित्या काम करण्याची आवश्यकता असते. स्वातंत्र्यानंतर शासनाने कल्याणकारी राज्याची संकल्पना स्विकारली आहे. ती अंमलात आणण्यासाठी महसूल विभाग आणि पोलीस विभाग परस्पर सहकार्याने काम करेल. दिलीप जगदाळे यांनी महसूल विभागातील नवे निर्णय व नियमांची माहिती दिली. दत्तात्रय बोरूडे यांनी महाराजस्व अभियानाची माहिती दिली.  प्रास्ताविकात पवार यांनी महसूल दिनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, महसूल विभागाचे काम दिवसेंदिवस विस्तारत आहे. गेल्यावर्षी 100 टक्के महसूलाचे उद्दीष्ट पुर्ण करण्यात आले. कापूस बोंडअळी नुकसानग्रस्त 85 हजार शेतक:यांना 89 कोटींचे अनुदान देण्यात आले. दुष्काळग्रस्त एक लाख तीन हजार शेतक:याना 74 कोटी अनुदान देण्यात आले. पीएम किसान योजनेअंतर्गत एक लाख 26 हजार शेतक:यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून 52 हजार शेतक:यांच्या खात्यावर पहिला तर 22 हजार शेतक:यांच्या खात्यावर दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. वर्षभरात 353 पोलीस पाटील आणि 92 कोतवालांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी या वर्षीच्या महाराजस्व अभियानाचा शुभारंभ नागरिकांना विविध प्रकारचे दाखले वाटप करून करण्यात आला. काणे गल्र्स हायस्कूल, डी.आर. हायस्कूल, अँग्लो ऊदरु हायस्कुल, एकलव्य विद्यालय, कमला नेहरू आणि श्रॉफ हायस्कूलच्या विद्याथ्र्यांनी कार्यक्रम सादर केले.    

गेल्या वर्षी चांगली कामगिरी करणा:या अधिकारी-कर्मचा:यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी जगदाळे आणि उपजिल्हाधिकारी खांदे यांचा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील कामगिरीबाबत तर अपर जिल्हाधिकारी बोरूडे यांचा सरदार सरोवर प्रकल्प बाधितांचे पुनर्वसनाबाबत विशेष सन्मान करण्यात आला. मंडळ अधिकारी हेमंत देवकर यांना पीएच डी पदवी मिळाल्याबद्दल, रविंद्र गावीत या नागरिकाने विरचक धरणात मृत झालेल्या व्यक्तिंचा शोध घेऊन बाहेर काढल्याबद्दल आणि मुख्याध्यापक दिनेश साळुंके यांचा आपत्ती व्यवस्थापन प्रबोधन कामाबद्दल सन्मान करण्यात आला. याशिवाय कोतवाल हिरालाल चौधरी, ओंकार परमार, संतोष पवार, शिपाई विशाल गावीत, शेख युनूस अहमद. वाहनचालक लक्ष्मण अहिरे, लिपीक गुणवंत पाटील व रोहीत गारगुंड, तलाठी प्रितम वसावे, किसन पावरा आणि सी.एन.सरगर, अव्वल कारकून दिलीप पाडवी आणि स्वप्निल मुळे, मंडळ अधिकारी प्रदिप खंडारे, नायब तहसीलदार राहूल वाघ, तहसीलदार मनोज खैरनार यांचा गौरव करण्यात आला.