कर्ज वसुलीच्या कारणातून बँक अधिका:यांना शिविगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:11 IST2019-07-26T12:10:52+5:302019-07-26T12:11:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गृह कर्जाच्या थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी बँक अधिकारी घरी गेले, याचा राग येवून एकाने बँकेत ...

Bank officials: debt relief due to debt collection | कर्ज वसुलीच्या कारणातून बँक अधिका:यांना शिविगाळ

कर्ज वसुलीच्या कारणातून बँक अधिका:यांना शिविगाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गृह कर्जाच्या थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी बँक अधिकारी घरी गेले, याचा राग येवून एकाने बँकेत जावून अधिका:यांना शिविगाळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रय} केल्याची घटना शहादा येथे घडली.  पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा येथील महाराष्ट्र बँकेतून गांधीनगर भागात राहणारे संजय सुदाम पाटील यांनी गृहकर्ज घेतले आहे. कर्जाची थकीत रक्कम वसुलीसाठी बँकेचे पथक संजय पाटील यांच्या घरी गेले. त्याचा राग त्यांना आला. 23 जुलै रोजी पाटील हे महाराष्ट्र बँकेच्या शाखेत गेले. तेथे मिलींद सोपानराव होळ यांना त्यांनी जाब विचारला. या वादातून त्यांनी शिविगाळ करीत बँकेत दहशत निर्माण करून शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद मिलींद होळ यांनी दिली. त्यावरून संजय पाटील यांच्याविरुद्ध शहादा पोलिसात शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
 

Web Title: Bank officials: debt relief due to debt collection