शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात बँक कर्मचारी व सुरक्षा रक्षकास मारहाण; एकावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : रांग तोडणाऱ्या ग्राहकास रांगेत उभे राहण्याचे सांगितल्याचा राग येऊन ग्राहकाने बँकेच्या शिपाई व सुरक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : रांग तोडणाऱ्या ग्राहकास रांगेत उभे राहण्याचे सांगितल्याचा राग येऊन ग्राहकाने बँकेच्या शिपाई व सुरक्षा रक्षकाला उलट मारहाण केली. या कर्मचाऱ्यांनी त्याला ही चोपले. हा प्रकार पोलिसांना कळविल्यानंतर त्यास ताब्यात घेत समज देवून सोडून देण्यात आले.याबाबत असे की, सोमवारी एक ग्राहक आपली केवायसी बँक खात्याला जोडण्यासाठी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बँकेत गेला होता. त्यावेळी बँकेसमोर ग्राहकांची रांग लागली होती. या व्यक्तीस तेथे ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने रांगेत उभे राहण्याचे सांगितले होते. हा व्यक्ती लाईन तोडून उभा होता. पुन्हा त्याला त्या कर्मचाºयांनी रांग तोडण्याबाबाबत जाब विचारला त्याचे वाईट वाटून या ग्राहकाने कर्मचाºयांवर हात उचलला. त्यांनतर कर्मचाºयांनी ही त्याला चांगलेंच चोपले. हा प्रकार पाहून ग्राहकही भयभीत झाले. शेवटी बँकेतील वरीष्ठ अधिकाºयांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस बँकेत दाखल झाले. ग्राहकाला पोलीस ठाण्यात नेऊन कडक समज देऊन सोडून देण्यात आले.याबाबत पोलीस ठाण्यात विचारले असता याप्रकरणी नोंद घेण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. तथापि या घटनेमुळे बँक कर्मचाºयांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, अश्या माथेफिरूचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.कोरोणा विषाणुच्या पार्श्वभूमीवर बँक कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत असतांना त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बँकेत रोज ग्राहकांची गर्दी दिसून येत असून, सोशल डिस्टन्सिंग राखणे जिकरीचे होत असल्याचे चित्र आहे. अश्यातच बँक कर्मचारी उपलब्ध तेवढे प्रतिबंधात्मक साहित्य वापरून ते सेवा पुरवित असतांना त्यांना ग्राहकांचा रोष देखील पत्करावा लागत आहे. त्यातच काहींची मारहाणीपर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे बँक कर्मचाºयांना आता कोरोना सोबत अश्या माथेफिरूनादेखील सामोरे जावे लागत आहेत.