कोरोना लसीकरणाच्या नावाखाली बोगस कॅालद्वारे बॅंक खाते होतेय साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:27 IST2021-03-14T04:27:31+5:302021-03-14T04:27:31+5:30

नंदुरबार : सध्या कोरोना लसीकरणासाठी बनावट फोन कॅाल नागरिकांना येऊ लागले आहेत. त्या आधारे ठगांकडून आधार नंबर आणि मोबाईलवर ...

Bank accounts are cleared through bogus calls in the name of corona vaccination | कोरोना लसीकरणाच्या नावाखाली बोगस कॅालद्वारे बॅंक खाते होतेय साफ

कोरोना लसीकरणाच्या नावाखाली बोगस कॅालद्वारे बॅंक खाते होतेय साफ

नंदुरबार : सध्या कोरोना लसीकरणासाठी बनावट फोन कॅाल नागरिकांना येऊ लागले आहेत. त्या आधारे ठगांकडून आधार नंबर आणि मोबाईलवर आलेला ओटीपी घेऊन बॅंक खात्यातून रक्कम ॲानलाईन हडप केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अशा फोन कॅालपासून नागरिकांनी सावध रहावे, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

सध्या सर्वत्र कोरोना लसीकरणाची चर्चा आहे. शासकीय तसेच खासगी केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसेच ४५ वर्षे वयोगटावरील नागरिक आणि वयोवृद्ध यांना लसीकरण केले जात आहे. यासाठी मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करावी लागत आहे. हीच संधी साधून काही ठकबाजांनी अर्थात हॅकर्सनी नागरिकांचे बॅंक अकाऊंट खाली करण्याचा सपाटा लावला आहे.

कोरोना लसीकरणासंदर्भात फोन कॅाल करून आपला नंबर लवकरच लागेल. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक मागितला जातो. तो दिला गेल्यावर एक ओटीपी जनरेट करून तो मोबाईलवर पाठविला जातो. तो ओटीपी मिळताच संबंधित हॅकर त्या संबंधित व्यक्तीचे बॅंक खाते प्राप्त करून त्याद्वारे खात्यातील रक्कम हडप करतात. असे अनेक प्रकार राज्यात घडले आहेत.

त्यामुळे कोरोना लसीकरणासंदर्भात कुठलाही फोन कॅाल आल्यावर आधी खात्री करूनच आपली माहिती द्यावी. शक्यतो अनोळखी कॅाल स्वीकारूच नये असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Bank accounts are cleared through bogus calls in the name of corona vaccination