नंदुरबारमध्ये ‘आंबा’ आवक वाढीमुळे ‘केळी’ घसरली

By Admin | Updated: May 23, 2017 13:08 IST2017-05-23T13:08:13+5:302017-05-23T13:08:13+5:30

शेवटच्या हंगामातील केळीची भरमसाठ आवक

'Banana' dropped due to the increase in Mango in Nandurbar | नंदुरबारमध्ये ‘आंबा’ आवक वाढीमुळे ‘केळी’ घसरली

नंदुरबारमध्ये ‘आंबा’ आवक वाढीमुळे ‘केळी’ घसरली

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.23- बाजारात आंब्याची आवक वाढल्याने गेल्या महिन्यात 1 हजार 400 रुपये क्विंटलर्पयत विक्री होणारी केळी सोमवारी दुपार्पयत 8 रुपये 50 पैसे दराने खरेदी करण्यात येत आह़े आंबा आवक वाढीमुळे केळी व्यापारावर मोठा परिणाम झाल्याची माहिती व्यापारी देत आहेत़ 
यंदा नंदुरबार जिल्ह्यात लागवड करण्यात आलेल्या केळीला प्रारंभीच्या काळात तब्बल 16 रुपये प्रतिकिलो दर मिळाला होता़ पिलबाग प्रकारातील केळीसाठी व्यापारी शेतक:यांना अॅडव्हान्स रक्कम देत असल्याचे दिसून आले होत़े यंदा केळीचा हंगाम जोरात असताना, बाजारात आंब्याची आवक वाढल्याने व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांनी आंबा खरेदी सुरू  केली़ यामुळे केळीचे दर अचानक घसरले आहेत़ बाजारात आंब्याला मागणी असल्याने शेतक:यांनी आणलेला माल बाजारात पडून आह़े सोमवारी सकाळपासून अचानक नंदुरबार बाजार समितीत केळीची प्रचंड आवक झाली होती़ या केळीला व्यापा:यांनी 700 ते 850 रुपये प्रतिक्विंटल दर दिल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत होत़े

Web Title: 'Banana' dropped due to the increase in Mango in Nandurbar