शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
3
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
4
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
5
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
6
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
7
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
8
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
9
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
10
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
11
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
12
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
13
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
14
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
15
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
16
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
17
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
18
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
19
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
20
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील आणखी एका शहरात ‘बदलापूर’; सफाई कर्मचाऱ्याकडून पाचवीतील मुलीचा विनयभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 06:57 IST

मुलीने रात्री आईला घडलेला प्रकार सांगितला. सकाळी आईने शाळा गाठून याबाबत तक्रार केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार : शहरातील एका शाळेतील पाचवीच्या ११ वर्षीय विद्यार्थिनीला शाळेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून विनयभंग केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संबंधित कर्मचारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापिका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील एका नामांकित शाळेत पाचवीच्या विद्यार्थिनीस रोजंदारी सफाई कर्मचारी असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीने मोबाइलमध्ये इंटरनेट सुरू करून दे असे सांगून त्यातील अश्लील चित्रफित दाखविली. मुलीने रात्री आईला घडलेला प्रकार सांगितला. सकाळी आईने शाळा गाठून याबाबत तक्रार केली. नंतर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार सफाई कर्मचारी, संस्थेचे चेअरमन व मुख्याध्यापिका यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

कर्मचाऱ्याला कामावरून काढले!- याबाबत शाळेने पत्रक काढले असून तक्रार येताच लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले. मुलीच्या आईच्या मागणीवरून ते त्यांनाही उपलब्ध करून दिले. - मुलीच्या आईने फिर्याद दिल्याने दुसरी फिर्याद घेता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे शाळेने स्पष्ट केले आहे. संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले आहे.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारsexual harassmentलैंगिक छळ