तळवे येथे लसीकरणाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST2021-04-28T04:33:01+5:302021-04-28T04:33:01+5:30

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना, हा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु लसीकरणाबाबत लोकांच्या मनात ...

Awareness about vaccination at Talwe | तळवे येथे लसीकरणाबाबत जनजागृती

तळवे येथे लसीकरणाबाबत जनजागृती

कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना, हा संसर्ग रोखण्यासाठी सर्व नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे, परंतु लसीकरणाबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आहेत, त्यामुळे लोक लस घेण्यासाठी धजावत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांचा गैरसमज दूर करून, त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक होते. त्यासाठी ग्रामपंचायत तळवे येथे सर्व लोकप्रतिनिधी, तसेच कर्मचारी यांची सभा घेण्यात आली. या सभेमध्ये नियोजन तयार करण्यात आले व त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यात आली. प्रसंगी गावचे सरपंच सरस्वती बारीकराव, सुरेश बारीकराव, उपसरपंच मंगेश मराठे, सुरेंद्र पाडवी, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी गावित मॅडम, ग्रामसेवक बी.डी. भलकर, तळवे केंद्राच्या केंद्रप्रमुख, गोदावरी पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निमेश सूर्यवंशी, वसंत मराठे, साहेबराव पाटील, देविदास मराठे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, इतर सर्व शिक्षक, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा वर्कर इत्यादी सर्वांनी गावात घरोघर जाऊन लोकांचे लसीकरणाबाबत प्रबोधन केले. त्यामुळे अनेकांनी लस घेण्याची तयारी दर्शविली आणि स्वतःचे नाव नोंदणी करण्यास अनुकूलता दर्शविली.

Web Title: Awareness about vaccination at Talwe