माध्यमिक शिक्षक संघातर्फे पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST2021-02-26T04:44:38+5:302021-02-26T04:44:38+5:30

शिक्षक भवनात संघाचे सल्लागार व माजी अध्यक्ष जे.व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नंदुरबार जिल्हा शिक्षण संस्था चालक ...

Award winning teachers by the Secondary Teachers Association | माध्यमिक शिक्षक संघातर्फे पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार

माध्यमिक शिक्षक संघातर्फे पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार

शिक्षक भवनात संघाचे सल्लागार व माजी अध्यक्ष जे.व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास नंदुरबार जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाचे सचिव डॉ.एन.डी. नांद्रे, नंदुरबार जिल्हा माध्यमिक संघाचे अध्यक्ष प्रभाकर नांद्रे, कार्याध्यक्ष ए.बी. पाटील, सचिव एस.एन. पाटील, उपाध्यक्ष पी.एम. वानखेडे, शहादा तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अंबालाल पाटील, तळोदा तालुका अध्यक्ष जी.बी. काटे, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष एल.बी. पाटील, नंदुरबार तालुका अध्यक्ष विजय पवार , नवापूर तालुका अध्यक्ष एस.एल. पाटील, धडगाव तालुका अध्यक्ष विजय पाटील, जिल्हा कार्यवाह पी.डी. पाटील, विश्राम पाटील, जिल्हा विद्या समितीचे अध्यक्ष आर.बी. वाघ, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पी.एल. भदाणे, पी.डी. शिंदे, पी.पी. पाटील, विक्रम खैरनार, रजाळे, महिरे, डी.पी. वळवी, राजेंद्र चौधरी, एस.आय. जोहरी आदी उपस्थित होते.

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य सुनील सोमवंशी व रणजितसिंह राजपूत यांचे तर ग.स. बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल जे.एन. पाटील व नीलेश पाटील यांचे तसेच न्याहली उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल ए.बी. पाटील यांचा व क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुष्पेंद्र रघुवंशी यांचा या वेळी सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रभाकर नांद्रे यांनी तर सूत्रसंचालन एस.एन. पाटील यांनी केले.

Web Title: Award winning teachers by the Secondary Teachers Association