नामांकित इंग्रजी निवासी शाळांचे ऑडिट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST2021-01-13T05:22:58+5:302021-01-13T05:22:58+5:30

या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक विभागातील ५१ शाळांत २३ हजार विद्यार्थी, अमरावती विभागातील ४५ शाळांत १४ हजार ४२२ ...

Audit the nominated English residential schools | नामांकित इंग्रजी निवासी शाळांचे ऑडिट करा

नामांकित इंग्रजी निवासी शाळांचे ऑडिट करा

या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक विभागातील ५१ शाळांत २३ हजार विद्यार्थी, अमरावती विभागातील ४५ शाळांत १४ हजार ४२२ विद्यार्थी, ठाणे विभागातील ३१ शाळांमध्ये १० हजार ५११ विद्यार्थी, नागपूर विभागातील ४५ शाळांमध्ये ९ हजार ७३० विद्यार्थी, असे एकूण १७२ शाळांमध्ये ५७ हजार ७६३ विद्यार्थ्यांची प्रवेशित नोंद आहे. या विद्यार्थ्यांच्या खर्चापोटी सन २००६ ते २०१५ या दरम्यान प्रति विद्यार्थी ५० हजार रुपयांप्रमाणे सरसकट अनुदान देण्यात आले. मात्र त्यानंतर अंशतः बदल करून २०१५ ते २०१७ दरम्यान महानगरपालिका क्षेत्रात ५० हजार, नगरपालिका क्षेत्रात ४५ हजार तर ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळांना ४० हजार रुपये प्रतिविद्यार्थी अनुदान देण्यात आले. २०१७ मध्ये विद्यार्थ्यांच्या ग्रेडेशनवर अनुदान निश्चित करण्यात आले. ‘अ’ श्रेणी मिळाल्यास ७० हजार, ‘ब’ श्रेणी असल्यास ६० हजार तर ‘क’ श्रेणी असल्यास ५० हजार रुपये प्रतिविद्यार्थी प्रतिवर्ष अनुदान संबंधित नामांकित संस्थेला दिले जाते. आतापर्यंत या योजनेवर २ अब्ज ८८ कोटी ८१ लाख रुपये खर्च झाले.

परंतु सन २००६ पासून ते अद्यापपर्यंत म्हणजे गेल्या १४ वर्षांपासून एकदाही या खर्चाचे लेखापरीक्षण करण्यात आलेले नाही. या योजनेवरील निधीचा विनियोग व्यवस्थित झाला अथवा नाही याकरिता सन २००६ ते २०२० पर्यंत या १४ वर्षाचे लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी बिरसा क्रांती दलाने केली आहे.

Web Title: Audit the nominated English residential schools